Post Views: 86
भैरवनाथ गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने बुधवारी मोफत डोळे तपासणी शिबीर
केळघर:येथील श्री.भैरवनाथ गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने बुधवारी मोफत डोळे तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे. अशी माहिती शिक्षक बँकेचे माजी संचालक शंकरराव जांभळे यांनी दिली. दरवर्षी भैरवनाथ गणेशोत्सव मंडळ गणेशोत्सव कालावधीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते.
यंदा मंडळाच्या वतीने बुधवारी गोपाल कृष्ण नेत्र चिकित्सालय वाई यांच्या तर्फे मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत करण्यात आले आहे. या शिबिरात मोफत डोळे तपासणी व उपचार मार्गदर्शन, अल्प दरात चष्मे वाटप करण्यात येणार असून परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. भैरवनाथ गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
