बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या
बीडमध्ये भाजप लोकसभा विस्तारकाची हत्या करण्यात आलेली आहे. बीड जिल्ह्यातल्या माजलगावमधील किट्टी आडगाव येथे बाबासाहेब आगे यांची हत्या करण्यात आलेली आहे. त्यामुळे आणखी एका हत्येच्या घटनेने बीड हादरलं आहे. या प्रकरणी आरोपी नारायण फपाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. हत्येचं कारण मात्र अद्याप समजलेलं नाही.
गेल्या चार महिन्यांपासून बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सातत्याने हाणामारी, हत्येच्या घटना बीड जिल्ह्यातून समोर येत आहेत. जुन्या हत्येचे प्रकरणं ताजे असतानाच आज पुन्हा एकदा भाजप लोकसभा विस्तारकाच्या हत्येने बीड जिल्हा हादरला आहे. धारधार कोयत्याने बाबासाहेब आगे यांची हत्या करण्यात आलेली आहे. कोयत्याने गळा कापून निर्घृणपणे ही हत्या करण्यात आलेली आहे. नारायण फपाळ याने ही हत्या केलेली आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून् चौकशी सुरू आहे.
घटना बीड शहरातील मध्यवर्ती भागात घडली, जेथे भाजप कार्यकता बाजारपेठेतून जात असताना, आरोपी नारायण फपाळ याने बाजार रोड परिसरात धारदार शस्त्राने हल्ला चढवला. हल्ल्यानंतर त्याची घटनास्थळीच मृत्यू झाला. भाजप कार्यकर्त्याच्या हत्येने शहरात एकच खळबळ उडाली असून, पोलीस प्रशासनाने तपास सुरू केला आहे.
