“बावधनचा पैलवान पुन्हा सज्ज — तानाजी कचरे यांचा विजयाचा बिगुल!”
बावधन गण सर्वसाधारण झाल्याने तानाजी कचरे पुन्हा एकदा नशीब आजमावणार
वाई – पंचायत समितीच्या मागील निवडणुकीत अवघ्या 113 मतांनी पराभव पत्करावा लागलेले तानाजी कचरे यांनी पुन्हा एकदा रणांगणात उतरण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. बावधन गण यंदा सर्वसाधारण झाल्याने कचरे यांनी पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.
मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्य करत असलेले आणि त्यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे तानाजी कचरे यांनी “गणातील जनतेचा विश्वास माझ्या सोबत आहे,” असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.
बावधन गावचे सुपुत्र असलेले कचरे हे ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणूनही कार्यरत राहिले आहेत. सामाजिक जाण आणि लोकसंपर्क यामुळे त्यांनी स्थानिक राजकारणात आपली ठसा उमटवला आहे. मागील निवडणुकीत स्वकीयांच्या दगाबाजीमुळे थोडक्यात पराभव झाला होता, तरीही त्यांनी हार न मानता सातत्याने सामाजिक कार्य सुरू ठेवले आहे.
सध्या ते वाई बाजार समितीचे संचालक असून, गावोगावी संपर्क साधत पुन्हा एकदा पराभवाची परतफेड करण्यासाठी सज्ज झाले आहेत. आगामी निवडणुकीत बावधन गणात तानाजी कचरे हे पुन्हा एकदा एक मजबूत दावेदार म्हणून समोर येत आहेत.
