कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » बावधन गणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला खिंडार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

बावधन गणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला खिंडार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

बावधन गणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला खिंडार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

वाई प्रतिनिधी-वाई येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी जनसंवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवक तालुका अध्यक्ष समाधान कदमआणि बावधन गणातीत दरेवाडी येथील सरपंच,उपसरपंच,सदस्य आणि असंख्य कार्यकर्त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी फुटीनंतर ॲड.विजयसिंह पिसाळ यांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुणांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला.परंतु स्थानिक नेतृत्वाकडून कोणतीही पक्षीय ताकद आणि पाठबळ मिळत नसल्याची खदखद गेले अनेक दिवस तरुणाच्या मनामध्ये होती.२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या उमेदवार अरुणादेवी पिसाळ यांच्या प्रचारादरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी जीवाची बाजी लावली. दुर्दैवाने त्यांच्या प्रयत्नांना पुरेसे यश न मिळाल्याने कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नाराजी पसरली होती.निवडणुकीनंतर शरद पवार गटाचे स्थानिक नेते कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम पाने उभे राहतील अशी आशा कार्यकर्त्यांना वाटत होती.परंतु त्यानंतर सर्व कार्यकर्ते ओस पडले होते अशी माहिती यावेळी समाधान कदम,मनोहर शिंदे यांनी पत्रकारांना दिली.

 यावेळी गेल्या काही दिवसांपूर्वी दरेवाडी गावचे सरपंच मनोहर शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक तालुका अध्यक्ष समाधान कदम यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मदन भोसले,दिलीप पिसाळ– पाटील,राजेंद्र कदम ,विक्रम पिसाळ – पाटील,प्रणित पाटील यांच्याशी संवाद साधून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आमदार मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा सन्मानाने घरवापासी करण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच येणाऱ्या काळात देखील इतर पक्षातील अनेक कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश होणार असल्याचे प्रणित पाटील यांनी सांगितले.

 यावेळी तालुक्यातील शरद पवार गटाचे युवक तालुका अध्यक्ष समाधान कदम तसेच दरेवाडी गावचे सरपंच मनोहर शिंदे,उपसरपंच सिंधू राजपुरे,ग्रामपंचायत सदस्य विजय राजपुरे, उषा थोपटे,अनुसया राजपुरे,वृषाली राजपुरे,भगवान थोपटे, कणुर-दरेवाडी विकास सोसायटी माजी संचालक चंद्रकांत राजपुरे,शंकर राजपुरे,सुधीर थोपटे,दादासाहेब भोसले,संपत राजपुरे,शामराव यादव,मधुसूदन यादव,राजेंद्र यादव,चंद्रकांत यादव,मारुती राजपुरे,बाळासाहेब राजपुरे,संतोष राजपुरे,हरी राजपुरे,बळीबा थोपटे,गजानन थोपटे,घनश्याम यादव,रामचंद्र येवले,पोपटराव राजपुरे,रवींद्र राजपुरे,किसन शिंदे,भिकू पिसाळ,सुरेश थोपटे या सर्वांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील,खासदार नितीन पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket