बावधन ची बंद पडलेली सुत गिरणी आम्ही चालू केली आ.मकरंद पाटील
सातारा -विरोधक म्हणतायत की आम्ही कोणती संस्था उभारली नाही पण मी तालुक्यातील बंद पडलेल्या संस्था पुन्हा चालू केल्या,तुम्ही ज्या संस्थांचे वाटोळे केले त्या संस्था आम्ही वाचविल्या असा हल्ला बोल आमदार मकरंद पाटील यांनी केला.बावधन गटातील व्याजवडी येथील प्रचारसभेत आ.मकरंद पाटील बोलत होते.या प्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रोहिदास बापू पिसाळ,किसनवीर चे संचालक दिलीप पिसाळ,वाई पंचायत समितीचे माजी सभापती मदन भोसले,वाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण तात्या पिसाळ,खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन शिवाजीराव पिसाळ,राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश पिसाळ,उद्योजक,ओबीसी तालुका अध्यक्ष अरविंद कुदळे,सरपंच मनीषा फरांदे,मा.सरपंच अप्पासाहेब पिसाळ,पतसंस्थेचे चेअरमन दिलीप पिसाळ, माजी तंटा मुक्ती अध्यक्ष सतीश नाना पिसाळ,सह्याद्री बँकेचे माजी संचालक दिनकर पिसाळ,सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पिसाळ, माजी तंटा मुक्ती अध्यक्ष संजय पिसाळ,सुनील निंबाळकर,प्रकाश निंबाळकर,पांडुरंग सपकाळ,अशोक पिसाळ,रामदास पिसाळ,संपत मालुसरे ई मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना मकरंद पाटील म्हणाले की १५ वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान तुम्ही मला दिला.माझ्या कामाकडे पाहून प्रत्येक निवडणुकीत तुम्ही चढत्या क्रमाने मला विजयी केलंय.आदरणीय मदन आप्पांनी सूतगिरणी चालू केली.त्यांच्या नंतर ती बंद पडली असता आम्ही ती चालू केली.दीड कोटी रुपये सुत गिरणीसाठी आम्ही दिले.आम्ही लक्ष दिलं नसतं तर ती सूतगिरणी कधीच चालू झाली नसती.विरोधक बोलत आहेत आम्ही कोणती संस्था उभारली नाही पण त्यांनी वाटोळं केलेल्या सर्व सस्था आम्ही वाचाविल्या.चालू केल्या.आज भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रोहिदास बापू स्वतःहून आपल्या व्यासपीठावर आलेत.रोहिदास बापू,तुमचं आमच्या सोबत असंन म्हणजे माझ्या उमेदवारीला खूप मोठी बळकटी मिळणं आहे.आशीर्वाद आहे.
रोहिदास पिसाळ म्हणाले की आ.मकरंद पाटील यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. तिन्ही तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे.आम्ही युती धर्म पाळणारच आणि आ.मकरंद पाटील यांना विक्रमी मतांनी निवडून आणणार
विक्रम पाटील म्हणाले की विधानसभा चालू झाली की कुठेतरी दुर्योधन तयार होतो.आणि त्याला आमदार होऊ वाटत.वैयक्तिक स्वार्थासाठी माणसं निवडणूक लढवतायत.आबांसारखा सुसंस्कृत नेता नाही.आपलेपणा जपणारा महाराष्ट्रातील एकमेव आमदार म्हणजे मकरंद पाटील होय.पुढील २५ वर्षात मकरंद आबांच्या सारखे नेतृत्व आपल्याला मिळणार नाही.म्हणून तर मकरंद आबांना प्रचंड मतांनी विजयी करायचं आहे.
या प्रसंगी बावधन गटातील,व्याजवाडी गावातील ग्रामस्थ,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बावधन गटामध्ये प्रचंड प्रतिसाद.
बावधन गटा मधील प्रत्त्येक गावामधे मकरंद आबांच्या प्रचारसभेमध्ये नागरिकांनी प्रचंड संख्येने सहभाग घेतला होता.प्रत्येक गावामधे अबाल वृद्ध लोक,महिला,तरुण तरुणी मकरंद आबाचे उस्पुर्त पने स्वागत करत होते.आबांच्या विजयाच्या घोषणा देत होते.