बंजारा समाजाच्या मागण्यांचे निवेदन पालकमंत्री श्री शंभूराज देसाई साहेब यांना सादर
सातारा |सातारा सद्गुरु सेवालाल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अर्जुन राठोड व संघटनेचे सचिव श्री राजू चव्हाण व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज बंजारा समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री शंभूराज देसाई साहेब यांना देण्यात आले. बंजारा समाजाला अनुसूचित जाती जमाती एसटी. प्रवर्गातून आरक्षणाचा दर्जा मिळावा या प्रमुख मागणीसाठी हे निवेदन मंत्री महोदयांना सादर करण्यात आले या मागणीकडे आपण स्वतःहून लक्ष घालू असे आश्वासन मंत्री शंभूराज देसाई साहेब यांनी दिले.
अर्जुन राठोड यांच्या नेतृत्वाखालील या चळवळीमुळे बंजारा समाजाच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले जात असून, समाजात एकजूट निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे.
याप्रसंगी संघटनेचे सचिव श्री राजू चव्हाण संघटनेचे खजिनदार कृष्णा राठोड बाबुराव, पवार रमेश राठोड, सुभाष राठोड, किसन नाईक,सिताराम चव्हाण,सोमा राठोड,महादू चव्हाण,बाळासाहेब चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
