बंजारा समाजाच्या मागण्यांचे निवेदन मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सादर
सातारा – सद्गुरु सेवालाल फाउंडेशन, सातारा यांच्या वतीने अध्यक्ष श्री अर्जुन राठोड व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज बंजारा समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना देण्यात आले.
बंजारा समाजाला अनुसूचित जाती-जमाती (ST) प्रवर्गातून आरक्षणाचा दर्जा मिळावा, या मुख्य मागणीसाठी हे निवेदन सादर करण्यात आले. या मागण्यांकडे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सकारात्मक पद्धतीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.
.या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत बाबुराव पवार, सीताराम चव्हाण, कृष्णा राठोड, महादेव चव्हाण, कृष्णा नाईक, सुभाष राठोड, बाळासाहेब चव्हाण, रमेश राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
