Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » बैंक ऑफ महाराष्ट्र सातारा अंचल विभागाने दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित केले वॉकथॉन : भ्रष्टाचाराविरुद्ध एकजूट होण्याचे आवाहन

बैंक ऑफ महाराष्ट्र सातारा अंचल विभागाने दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित केले वॉकथॉन : भ्रष्टाचाराविरुद्ध एकजूट होण्याचे आवाहन

बैंक ऑफ महाराष्ट्र सातारा अंचल विभागाने दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित केले वॉकथॉन : भ्रष्टाचाराविरुद्ध एकजूट होण्याचे आवाहन

दक्षता जनजागृती सप्ताह २०२५ च्या उद्घाटनप्रसंगी बैंक ऑफ महाराष्ट्र सातारा अंचल विभाग ने वॉकथॉनचे आयोजन केले. या वॉकथॉनमध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. कर्मचाऱ्यांनी हातात भ्रष्टाचारविरोधी फलक घेऊन प्रामाणिकपणाचा संदेश दिला.

या वॉकथॉनचा मुख्य उद्देश लोकांना एकत्रित करून भ्रष्टाचारविरोधात आवाज उठवण्यासाठी प्रोत्साहित करणे हा होता. चालत असताना जनजागृती फलक आणि घोषणांच्या माध्यमातून समाजात नैतिकता आणि पारदर्शकतेची भावना रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

२०२५ च्या दक्षता जनजागृती सप्ताहाचा विषय ‘दक्षता: आपली सामूहिक जबाबदारी’ (Vigilance: Our Shared Responsibility) असा आहे. हा विषय जनसामान्यांमध्ये भ्रष्टाचारविरोधात जागृती निर्माण करण्यावर भर देतो.

दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने बैंक ऑफ महाराष्ट्र सातारा अंचल विभाग ने विविध कार्यक्रमांना आयोजित करण्याचा संकल्प घेतला आहे. आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात बँकेच्या विविध शाखामध्ये तक्रार निवारण शिबिर, विविध गावात ग्राम सभा असे अनेक कार्यक्रम समाविष्ट आहेत. ह्या सप्ताहाची सुरुवात बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सत्यनिष्ठेची प्रतिज्ञा घेउन केली.

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा

साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम‘आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा सातारा  प्रतिनिधी –साताऱ्याची ओळख, संस्कृती, एकतेचा अभिमान आणि

Live Cricket