Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » महाबळेश्वरमध्ये युवा ग्रामीण पत्रकार संघाने साजरा केला पत्रकार दिन

महाबळेश्वरमध्ये युवा ग्रामीण पत्रकार संघाने साजरा केला पत्रकार दिन

महाबळेश्वरमध्ये युवा ग्रामीण पत्रकार संघाने साजरा केला पत्रकार दिन

महाबळेश्वर, ता. ६ जानेवारी – मराठी भाषेतील आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी जनसामान्यांपर्यंत माहिती पोहोचण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या ‘दर्पण’ वृत्तपत्राच्या स्मरणार्थ आज येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला. द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी महाबळेश्वर नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील, वकील संजय जंगम, अर्बन बँक संचालक सतीश ओंबळे, जेष्ठ पत्रकार संजय दस्तुरे, न.पा. चे मुख्य लिपिक आबा ढोबळे, राजेंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(शरद पवार) शहराध्यक्ष शंकर पवार, शिवसेना पक्षाचे उपशहरप्रमुख सचिन गुजर, पत्रकार अभिजित खुरसणे, संदीप देवकुळे, प्रेषित गांधी, संदेश भिसे, द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष राहुल शेलार, सचिव रियाज मुजावर, राजेश सोंडकर, मिलिंद काळे, अमोद पवार उपस्थित होते.

यावेळी मुख्याधिकारी योगेश पाटील, जेष्ठ पत्रकार संजय दस्तुरे, वकील संजय जंगम, राजेंद्र पवार, द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष राहुल शेलार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या योगदानाची प्रशंसा केली आणि पत्रकारांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रियाज मुजावर यांनी केले तर मिलिंद काळे यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

फ्लेमिंगो सूर्याचीवाडीच्या तलावात दाखल

Post Views: 23 फ्लेमिंगो सूर्याचीवाडीच्या तलावात दाखल सातारा -पक्षी प्रेमींसाठी एक महत्वाची बातमी आहे. हिमालय पर्वत ओलांडून स्थलांतरित करणाऱ्या पक्षांपैकी

Live Cricket