Home » ठळक बातम्या » बाळासाहेब पाटील गटाला खिंडार उत्तर मधील अनेक कार्यकर्त्यांचे भाजप प्रवेश

बाळासाहेब पाटील गटाला खिंडार उत्तर मधील अनेक कार्यकर्त्यांचे भाजप प्रवेश

बाळासाहेब पाटील गटाला खिंडार उत्तर मधील अनेक कार्यकर्त्यांचे भाजप प्रवेश

 सातारा -कोरेगाव पंचायत समितीचे माजी पंचायत समिती सदस्य व तारगाव गावचे माजी सरपंच सुनील मलवडकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीत काल प्रवेश केला. 

 राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाल्यापासून सातारा जिल्ह्यामध्ये शरद पवार गटाला गळती लागलेली आहे. विधानसभेतील दारून पराभवानंतर अनेक राष्ट्रवादीतील नेते इतर पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. गावातील विकास कामे करण्यासाठी विकास निधी आणायचा असेल तर सत्ताधारी गटाबरोबर राहणं गरजेचं असते. त्यामुळे अनेक इच्छुक भाजपमध्ये व इतर सहयोगी पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. मागच्या आठवड्यामध्ये हिंदकेसरी पैलवान संतोष वेताळ यांनी आमदार मनोजदादा घोरपडे गटामध्ये प्रवेश केला होता. काल तारगाव गावचे माजी सरपंच पंचायत समिती सदस्य सुनील मलवडकर, अशोक निकम सर, माजी सरपंच अशोक तावरे, व्हाईस चेअरमन संजय घोरपडे, कृष्णा मोरे, अमीर मुलानी, लक्ष्मण मोरे, रामभाऊ निकम, महेश भोसले, प्रकाश मोरे, सुधाकर काटे ,रमेश घाडगे, विजय कुदळे आधी शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 

 यावेळी बोलताना आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले कराड उत्तर मध्ये विकास करत असताना कधीही राजकारण केलेले नाही परंतु पक्ष वाढीसाठी ज्यांना पक्षांमध्ये यायचं आहे त्यांचे निश्चितच मी स्वागत करणार आहे येणाऱ्या काळामध्ये कराड उत्तर मधील अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 

 यावेळी पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब निकम, विनायक भोसले, राजकुमार मोरे, दिलीप देशमुख, अभिजीत घोरपडे, प्रशांत निकम, प्रकाश भोसले, बंडा कणसे, सुरेश थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना अँप्रन बंधनकारक.. राज्य सरकारचे महाविद्यालयांना स्पष्ट निर्देश, निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत ..

Post Views: 14 राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना अँप्रन बंधनकारक.. राज्य सरकारचे महाविद्यालयांना स्पष्ट निर्देश, निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत .. वैद्यकीय सेवा

Live Cricket