बदलाच्या दृष्टीने सह्याद्रीच्या सभासदांची वाटचाल– आमदार मनोज घोरपडे
– विद्यमान चेअरमनांनी खुप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप
– सत्तांतर झाल्यावर ए टू झेड टंग्याचा बंदोबस्त केला जाईल
उंब्रज प्रतिनिधी – सह्याद्रीचे वारे आता बदलाच्या दिशेने वाहू लागले आहे. ही निवडणूक सभासदांनीच हातात घेतली असून विद्यमान चेअरमनांनी माफी नामे लिहून घेतल्याचे सभासद विसरले नाहीत. जाणिवपूर्वक वारस नोंदी टाळल्या. कामगारांचा खासगी कामांसाठी गैरवापर केला. गेल्या ३०-४० वर्षात सह्याद्री कारखान्यात ७०-८० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार मनोजदादा घोरपडे यांनी केला.
इरिगेशन संस्थाच्या माध्यमातून निर्माण केलेल्या दबावात आता कुणीही राहण्याची गरज नाही. उलट इरिगेशन संस्थाना आपण अधिक उर्जित अवस्था मिळवून देवू असा विश्वास आमदार मनोज घोरपडे यांनी व्यक्त केला. कराड उत्तरचा पाणी प्रश्न सोडवणे हा माझ्या कामाचा प्रमुख अजेंडा असल्याचे ते म्हणाले.
तळबीड ता. कराड येथे स्व. यशवंतराव चव्हाण परिवर्तन पॅनेलच्या प्रचारार्थ ते बोलत होते. यावेळी खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिल बाजीराव मोहीते, सह्याद्री कारखान्याचे माजी संचालक रमेश मोहीते, गामपंचायत सदस्य राजेंद्र मोहीते, माजी उपसरपंच दादासाहेब मोहीते, अॅड. शशिकांत मोहीते, सुनिल आप्पासाहेब मोहीते, माणिक पाडळे, सुभाष गायकवाड, विकास यादव, बाबा माने, विलास गायकवाड, संजय चव्हाण, सयाजीराव मोहीते, सुजय मोहीते, शालिनीताई गुणवंत, महादेव गायकवाड, सुधाकर तुपे, प्रकाश मोहीते, रमेश मोहीते, सिध्दार्थ भोसले, संजय घोरपडे, संपतराव जाधव, अशोकराव चव्हाण, भास्कर पवार, महेशबाबा जाधव तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार मनोज घोरपडे म्हणाले, आज मी अपघाताने आमदार झाल्याची टीका केली जाते परंतु कराड उत्तर मधील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी साडेतीन महिन्यात काम केले. तुम्ही पंचवीस वर्षात काय केले एक तरी नाव सांगा. सह्याद्री हा महाराष्ट्रात नावाजलेला कारखाना पण तुमच्यावरच कारखाना वाचवायला पाहिजे असं म्हणण्याची वेळ आली पण कारखाना अडचणीत आणला कोणी? तुम्ही अमर्याद सत्ता वापरून स्वतःचे घर भरलं, कामगारांचा वैयक्तिक कामासाठी गैरवापर केला जातो. कारखान्यात फार मोठा भ्रष्टाचार झाला असून विद्यमान चेअरमनांनी 40 वर्षात 70 ते 80 कोटी स्वतःच्या कुटुंबावर उडवले असल्याचा आरोप आमदार मनोज घोरपड यांनी केला.
ऊस जाण्याच्या बाबतीत एकही शेतकरी, सभासद समाधानी नाही. फक्त चेअरमन व त्यांचे कुटुंब समाधानी आहे. सगळ्यांची लूट करून राजकारणात पैसा वापरला. विधानसभा निवडणुकीत जनतेने यांना दाखवून दिले आता कारखान्यात बदल करायचाय असे प्रत्येक सभासदाची म्हणणे आहे. पाणी संस्थेच्या माध्यमातून सभासदांवर दबाव टाकला जातो अधिकार त्यांना दिला कोणी. इरिगेशन योजनांसाठी तुमचे योगदान काय दरवर्षी इन्स्पेक्शनच्या नावाखाली दोन लाख रुपये फी घेऊन जाता. मात्र 40-50 वर्षात इरिगेशन संस्थांमध्ये नवीन टेक्नॉलॉजी बाबत सकारात्मक विचार का केला नाही. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा नियोजन मधून १६ तासांची लाईट योजनांना दिली मात्र यांच्याकडे लोक गेले असता यांनी 70-80 लाख रुपये घेऊन या असे सांगितले. पण येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना 24 तास लाईट देता येईल असे नियोजन करू असे आमदार घोरपडे म्हणाले. कारखान्याच्या सर्व पाणीपुरवठा योजनांना ऊर्जेत अवस्था येण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
कारखान्यात सत्तांतर झाल्यावर ए टू झेड टंग्याचा बंदोबस्त केला जाईल. तसेच विद्यमान चेअरमनांनी हजारो एकर जमिनी कशाच्या पैशातून विकत घेतल्या असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपण शेतकऱ्यांच्या पोराला आमदार केलं कारखान्यात परिवर्तन करा राज्यात नव्हे तर देशातील अग्रगण्य संस्था म्हणून हा कारखाना उदयास आणू. आजवर विद्यमान चेअरमनांनी आपण कारखान्याचे मालक आहोत अशी वागणूक शेतकरी सभासदांना दिली त्यांचे माफी नावे लिहून घेतले पण सभासदच या निवडणूक दाखवतील खरे मालक कोण आहे. आज सभासदांना हा कारखाना आपला वाटत नाही. तर तो चेअरमन यांचा वाटत, इतकी दहशत निर्माण झाले आहे पण यांना जसं माजी आमदार केलं तसं माझी चेअरमन या निवडणुकीत करायचा आहे. कारखान्याच्या विस्तारीकरणाचे काम साडेतीन वर्षात पुर्ण झाले नाही या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच वारस नोंदी पेंडिंग आहेत जाणून-बुजून त्यांनी सभासदांना हक्कापासून मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी व ठराविक बगलबच्चांना बरोबर घेऊन ही संस्था कायम ताब्यात ठेवण्याच्यासाठी वारस नोंदी चढवला नाहीत. परंतु महिन्याभरात आपण हे चित्र बदलून वारस नोंदी करू. रखडलेल्या साडेआठ हजार सभासदांच्या वारस नोंदी करून रक्तातील नात्यात शेअर्स ट्रान्सफर करून देण्याचे आश्वासन यावेळी आमदार घोरपडे यांनी दिले. यावेळी सह्याद्री कारखान्याचे माजी संचालक रमेश मोहिते, एडवोकेट शशिकांत मोहिते, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले.
