Home » राज्य » शिक्षण » आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन महाविद्यालयाचे सेट व सीटीईटी परीक्षेत उज्ज्वल यश

आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन महाविद्यालयाचे सेट व सीटीईटी परीक्षेत उज्ज्वल यश 

आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन महाविद्यालयाचे सेट व सीटीईटी परीक्षेत उज्ज्वल यश 

 सातारा- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेतल्या जाणाऱ्या महाविद्यालयीन प्राध्यापक पदासाठीच्या सेट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेमध्ये आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन महाविद्यालयातील श्री राजन दोलताडे, लतिका इंगळे, राहुलदेव रणवरे , अशोक सावंत, विकास बोंद्रे हे सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. तसेच शालेय शिक्षक होण्यासाठीच्या सीटीईटी या पात्रता परीक्षेचा केंद्रीय शिक्षण मंडळाकडून निकाल जाहीर झाला आहे. याही परीक्षेमध्ये महाविद्यालयातील शितल गुरव, सायली जाधव, कोमल माळी, जयश्री रासकर, सुशील माने, श्रुतिका भस्मे, सोनाली काळे, प्रज्ञा पोतदार, पूजा चव्हाण, वर्षा कुंभार, प्रियांका लोंढे, श्रीवर्धन पाटील, पूजा शिंदे, श्वेता फडतरे, शिल्पा तांबारे, अश्विनी जाधव, अर्चना मोहिते, मयुरी जाधव, लक्ष्मीबाई सलगरे असे एकूण १९ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. त्याबद्दल महाविद्यालय विकास समिती सदस्य,महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वंदना नलवडे मॅडम, उपप्राचार्य प्रोफेसर डॉ. नंदकुमार धनवडे, विभाग प्रमुख सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये दोन दिवसीय करिअर मेळाव्याचे आयोजन 

Post Views: 28 यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये दोन दिवसीय करिअर मेळाव्याचे आयोजन  करिअर विषयक मार्गदर्शना सोबतच, नोकरीची संधी उपलब्ध करून

Live Cricket