Home » ठळक बातम्या » वेळे गावात तुफान आलं या

वेळे गावात तुफान आलं या 

वेळे गावात तुफान आलं या 

 सातारा – अती पर्जन्यमान असलेल्या वाई तालुक्यातील वेळे, केंजळ, कवठे गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी तिन्ही गावात गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदान, लोकसहभाग, लोकवर्गणीतून जलसंधारण कामांना सुरुवात केली असून याला वेळे गावाला नाम फाऊंडेशन पोकलेन, ज्ञानदीप पतपेढी तब्बल ४ लाखांची मदत, परांजपे ग्रुपने सीएसआर मधून मदत केली.यातून शनिवार दि.११ रोजी या कामाला शेकडोंच्या उपस्थितीत सुरूवात झाली असून आता वेळे गावात जलसंधारण कामासाठी ” तुफान आलं या…!” याची प्रचिती आली.

निसर्गाच्या बदलामुळे यावर्षी पाऊस कमी झाला आणि अती पर्जन्यमान असलेल्या वाई तालुक्यातील अनेक गावांत भिषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.गाव पुढारी प्रशासनाकडे पाण्याच्या टॅंकरची मागणी करण्यासाठी हेलपाटे मारु लागले आहेत.तर अशीच पाणी टंचाई निर्माण झालेल्या वेळे,केंजळ, कवठे गावात मात्र हा प्रश्न कायम स्वरूपी निकाली काढण्यासाठी गेल्या महिनाभरापासून श्रमदान आणि लोकसहभागातून जल संधारणाची कामे करण्यास सुरुवात केली आहे.

वाई पंचायत समितीचे नुतन गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंधारण कामांचे नियोजन केले आहे. नियमित श्रमदानाला तिन्ही गावात लोकसहभाग वाढला असून आता मोठ्या प्रमाणावर लोकवर्गणी जमा होऊ लागली आहे.याची दखल घेऊन नाम फाऊंडेशन, ज्ञानदीप पतपेढी ग्रुप, परांजपे ग्रुपने मदतीचा हात देत अधिक प्रोत्साहन मिळाल्याने प्रथम वेळे गावात जलसंधारण कामाला मशीनच्या सहाय्याने शुभारंभ शनिवार दि.११ मे रोजी सकाळी ११ वा.गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय जाधव, ज्ञानदीप को ऑप सोसायटीचे एकनाथ जगताप, बी.आर.पवार, दिलीप चव्हाण आणि संचालक, नाम फाऊंडेशनचे बाळासाहेब शिंदे,गणेश गायकवाड, स्वप्नील थोरात परांजपे ऑटो कास्ट प्रा.लि.ग्रुपचे शिरीष पवार, महेश शिंदे आणि वेळे गावाचे सरपंच, उपसरपंच, सदस्य , ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.

या कामासाठी अनेक हजारो रुपयांची मदत दिली असून यापुढे ही नियमित श्रमदान आणि मशीनद्वारे डीप सीसीटी,ओढा खोलीकरण, वनराई बंधारे, कामे पावसाळ्यापूर्वी पुर्ण करण्याचा निर्धार सरपंच अर्चना गायकवाड, उपसरपंच उषा पवार,ग्रामसेवक हिंदूराव (नाना)डेरे यांनी सांगितले.

जलसंधारणासाठी तुफान आणणार 

अती पर्जन्यमान असलेल्या वाई तालुक्यात पाणी टंचाई प्रश्न निर्माण झाला आहे.अनेक गावात ही भिषणता जाणवतं असून वेळे,केंजळ, कवठे गावाने यातून बोध घेऊन जलसंधारण कामे करण्यास सुरुवात केली आहे. इतर ही गावांनी या तिन्ही गावाला भेटी देऊन आपल्या ही गावात अशा कामांना प्राधान्य दिले पाहिजे. यासाठी पंचायत समिती सर्व ते सहकार्य करेल.चला तुमच्या ही गावात जलसंधारणासाठी तुफान आणू या, असे आवाहन गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी वाई तालुक्यातील गावांना केले आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल

Post Views: 78 नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते

Live Cricket