प्रभागाला ‘रोल मॉडेल’ बनवण्याचा आशाताई वन्ने यांचा संकल्प
पाचगणी (प्रतिनिधी) प्रभाग क्रमांक ९ (अनुसूचित जातीकरिता आरक्षित) मधून सौ.आशाताई नितीन वन्ने यांनी निवडणुकीच्या मैदानात उभे राहत प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प जाहीर केला आहे. प्रसिध्दीपासून दूर राहून लोकहितासाठी कार्य करणाऱ्या आशाताई वन्ने यांनी पती नितीन वन्ने यांच्या सोबतीने सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे.
प्रभागातील मूलभूत सुविधांचा विकास, पाणीपुरवठा, डोंगराळ भागातील कच्चे रस्ते काँक्रिटीकरण, सांडपाणी व कचरा व्यवस्थापनाची सुधारित यंत्रणा हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. महिलांना स्वयंरोजगार, युवकांसाठी व्यवसायभिमुख प्रशिक्षण व कर्ज योजनांची उपलब्धता, विशेष रुग्णवाहिका व शववाहिनी, नाना-नानी पार्क आणि वाचन कट्टा उभारण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.
सिद्धार्थनगर वस्तीतील रस्त्यांच्या बिकट समस्यांवर तोडगा, उंच ठिकाणी पाणीटाकी, तसेच कंत्राटी कामगारांच्या हितासाठी सतत प्रयत्न हे त्यांचे विशेष प्राधान्य असेल.प्रभागाचा विकास म्हणजे आपला विकास” असा नारा देत, आशाताई वन्ने यांनी नागरिकांना आपल्या ‘विकास संकल्पा’ला साथ देण्याचे आवाहन केले आहे.




