कलाप्रदर्शनाची सांगता
गौरीशंकर एज्युकेशन सोसायटीचे कला महाविद्यालय सातारा ( पाटखळ माथा ) व दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था , सातारा यांचे संयुक्त विद्यमाने 28 वे वार्षिक कला प्रदर्शन ( शै. वर्ष – 2024-25 )दिनांक 17 18 व 19 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडले दिनांक 19 रोजी दोन सत्रांमध्ये या कलाप्रदर्शनाची सांगता झाली, यातील पहिल्या सत्रामध्ये कॅमलचे झोनल प्रमोशन मॅनेजर श्री नंदकुमार गायकवाड यांनी – सायन्स बीहाईड कलर या विषयावर सविस्तर स्लाईड शो तसेच रंग बनवण्याची प्रक्रिया, कॅमलची विविध प्रॉडक्ट, त्यांचा चित्रकारांनी कोणत्या पद्धतीने विचार करावा / वापर करावा या दृष्टीने चर्चा, प्रश्न उत्तरे या स्वरूपात मार्गदर्शन केले, तसेच कॅमलचे – प्रवीण अडसूळ सर यांनी प्रत्यक्ष कॅमलची प्रॉडक्ट दाखवली व पहिले सत्र पार पडले ,यामध्ये कला महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थ्यांनी तसेच जिज्ञासू कलाप्रेमींनीआपला सहभाग नोंदवला, यानंतर त्याच सत्रात कला महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी व प्रतिथयश चित्रकार रामचंद्र खरटमल ( पुणे ) यांनी विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार कॅमलचे नविनच लॉच झालेले ग्वॉश मिडीयम या माध्यमात स्मरणचित्र व त्या अनुषंगाने येणारे विविध प्रश्न जसे घटक निवड, मांडणी, रंग नियोजन, विषयाचा मुख्य भाग – गाभा मांडणी या दृष्टीने अकॅडमिक शैलीमध्ये हे चित्र कशा पद्धतीने पूर्ण करायचे हे विविध चित्रकृती व एका प्रतीकात्मक अंतिम चित्राद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रथम सत्रातील चित्रकार खरटमल यांचे चित्र प्रात्यक्षिकाच्या अनुषंगाने कु. सुनिता कांजिले कु. सपना मतकर तसेच कु.सिद्धी देवरुखकर यांनी या प्रात्यक्षीकाचे नियोजन केले.
याच दिवशी दुपारी चार वाजता बक्षीस समारंभाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सातारा सैनिक स्कूल चे माजी कलाशिक्षक श्री संजय नाईक यांना निमंत्रीत करण्यात आले होते यावेळी कला महाविद्यालयातर्फे त्यांचा यथोचित सत्कार व स्वागत केले गेले ,बक्षीसांसाठीचे प्रमुख प्रायोजक- रंगराव जाधव ( शाहुपूरी -सातारा ) रामचंद्र खरटमल (पुणे ) कॅमल चे नंदकुमार गायकवाड ( पुणे ) अतुल निगवेकर ( सातारा ) माजी मुख्याध्यापक व कलाशिक्षक – शौकत अली शेख ( शाहुपुरी, सातारा )हे प्राथमिक स्वरूपात उपस्थित होते, तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये श्री शिरीष चिटणीस , डॉ शाम बडवे,श्री श्रीरंग काटेकर, प्राचार्य विजयकुमार धुमाळ यांनी प्रार्थनीय उपस्थिती दर्शवली, यावेळी एकूण नऊ पुरस्कारांचे वितरण केले गेले यामध्ये – विवेक जाधव स्मृती पुरस्कार , स्व.गुलाब बाई पोतदार स्मृती पुरस्कार, स्व .शोभा खरटमल, स्व.शिवाजी खरटमल स्मृती पुरस्कार, राम सूर्यवंशी पुरस्कार, लैलाबी मोहम्मद शेख स्मृती पुरस्कार, स्व.स. धूं. बापट स्मृती पुरस्कार, वर्षा निगवेकर स्मृती पुरस्कार, स्व. रजनीताई दांडेकर व स्व.सुभाष दादा दांडेकर स्मृती पुरस्कार यांचे वितरण केले गेले यावेळी मान्यवरांनी बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच इतर विद्यार्थ्यांना उत्कृष्ट कामासाठी प्रोत्साहित केले, येणाऱ्या भावी वार्षिक परीक्षांसाठी शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रण तसेच व्हिडिओग्राफी ओम नारकर यांनी केली,सुत्रसंचलन तसेच आभार प्रदर्शन कु. ऋतुजा लोहार, कु. गायत्री गायकवाड यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी ,माजी विद्यार्थी तसेच कला महाविद्यालयीन कार्यालयीन कर्मचारी वर्ग यांनी उपस्थिती दर्शवली व संपूर्ण नियोजनात सहभाग घेतला.
