धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्यपदी प्रा.डॉ.गणेश जाधव यांची नियुक्ती
सातारा : येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी १ जानेवारी २०२५ रोजीपासून इंग्रजी विषयाचे प्रा.डॉ.गणेश विजयकुमार जाधव यांची नियुक्ती रयत शिक्षण संस्थेने केली आहे. प्रा. डॉ.गणेश जाधव यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयात २९-७ -२००२ पासून इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले आहे. त्यांची इंग्रजी विषयात ९ पुस्तके प्रकाशित असून ३० शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. २१ ग्रंथात त्यांनी घटक लेखन केले आहे. १०० पेक्षा जास्त त्यांनी व्याख्याने दिलेली आहेत. त्यांनी १ मेजर व ३ मायनर प्रोजेक्ट पूर्ण केले आहेत. १५ पेक्षा जास्त परिषदा व चर्चासत्राचे त्यांनी आयोजन केले आहे. नॅक मुल्यांकन या विषयाची तयारी करण्यासाठी व गुणवत्ता वाढविण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या पियरटीमचे सदस्य म्हणून काम करून १७ महाविद्यालयांचे एस.एस.आर तपासून दिले आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ साताराचे नियामक मंडळात ते सदस्य असून,शिवाजी विद्यापीठ,कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ,आय.आय.टी इस्लामपूर ,वालचंद कॉलेज,सोलापूर ,या संस्थामध्ये ते अभ्यास मंडळात सहभागी सदस्य आहेत. धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयाचे नॅक मूल्यांकन अलीकडेच झाले असून महाविद्यालयास ए.प्लस. प्लस. ही ग्रेड मिळाली आहे. यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षचे समन्वयक म्हणून अंत्यंत महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. २०१७ मध्ये डी.पी.भोसले कॉलेजला ए ग्रेड मिळाली त्याही वेळी ते समन्वयक होते. डॉ.पतंगराव कदम आदर्श स्वायत्त महाविद्यालय पुरस्कार,कर्मवीर पारितोषिक २०२३-२४ हे मिळविण्यात समन्वयक म्हणून त्यांचे महत्वाचे योगदान राहिले आहे. ते ‘धनंजय’ या वार्षिक नियतकालिकाचे ५ वर्षे संपादक होते. कॉलेजची उत्कृष्ट माहिती पुस्तिका त्यांनी तयार केली. इंग्रजी विषयाचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून म्हणून त्यांनी कार्य केले आहे. पीएच.डी च्या ५ विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांना २ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. २०२३ मध्ये वर्ल्ड ए.डी. सांइनटीफिक ranking मध्ये त्यांचा समावेश होता .गुणवत्ता, सौजन्यशीलता ,नैतिकता , जबाबदारीने काम वेळेत करण्याची त्यांची पद्धत इत्यादीमुळे अनेक महाविद्यालयात त्यांना ओळखले जाते. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, संघटक डॉ.अनिल पाटील , कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.ज्ञानदेव म्हस्के , सचिव विकास देशमुख ,उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ.विजय कुंभार, माध्यमिक विभागाचे सहसचिव श्री.बी.एन .पवार,रयत शिक्षण संस्थेच्या ऑडीट विभागाचे सचिव प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे , डी.जी .कॉलेजचे माजी प्रभारी प्राचार्य डॉ.व्ही.के .सावंत इत्यादींनी व स्टाफ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.