निवृत्ती वेतनासाठी हयातीचे दाखले 31 डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे सातारा कोषागाराचे आवाहन
सातारा – सातारा जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तीवेतन घेणा-या ज्या निवृत्तीवेनधारक, कुटूंबनिवृत्तीवेतन धारकांनी माहे नोव्हेंबर 2025 मध्ये बँकेमध्ये हयातीच्या दाखल्यावर स्वाक्षरी केलेली नाही. किंवा ऑनलाईन जीवनप्रमाणपत्र दाखला दिलेला नाही, अशा निवृत्तीवेनधारक, कुटूंबनिवृत्तीवेतनधारकांनी दि.31 डिसेंबर पर्यंत जिल्हा कोषागार कार्यालय, सातारा येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून हयातीचा दाखला सादर करावा किंवा ऑनलाईन जीवनप्रमाणपत्र दाखला भरावा असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती आरती नांगरे यांनी केले आहे.
जे निवृत्तीवेतनधारक ऑनलाईन जीवनप्रमाणपत्र सादर करणार आहेत त्यांनी सर्व माहिती बरोबर भरली गेली असलेबाबत स्वतः खात्री करावी. निवृत्तीवेतनधारक, कुटूंबनिवृत्तीवेतनधारक दि.31 डिसेंबरपर्यंत हयातीचा दाखला सादर करणार नाहीत त्यांचे या कारणामुळे निवृत्तीवेतनाचे प्रदान बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे हयातीचे दाखले विहीत वेळेत सादर करावेत असे आवाहन श्रीमती नांगरे यांनी केले आहे.




