कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » रास्त भाव दुकानांसाठी 31 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

रास्त भाव दुकानांसाठी 31 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

रास्त भाव दुकानांसाठी 31 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सातारा, दि. 31 : सातारा जिल्हयातील शिधापत्रक धारकांची होणारी गैरसोय दूर करण्याकरीता सध्याची रास्त भाव दुकाने कायम ठेवून आजमितीस रद्द असलेली, राजीनामा दिलेली, व लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाची नवीन रास्त भाव दुकाने प्राधान्यक्रमानुसार मंजूर करण्यात येणार आहेत. तरी इच्छुकांनी संबंधित तहसिल कार्यालय, पुरवठा शाखा यांचेकडे संपर्क साधाया व विहीत मुदतीत आवश्यक त्या कागदपत्रांसह तहसिलदार यांच्याकडे 31 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

यामध्ये, सातारा तालुका गावे ७, शहरी ठिकाणे – ०१, वाई तालुका – गावे-१५, कराड तालुका गावे- ५, महाबळेश्वर तालुका-४३, कोरेगाव तालुका -१३, खटाव तालुका-११, फलटण तालुका ५, पाटण तालुका-२२, माण तालुका-४, खंडाळा तालुका-७, जावली तालुका ८ अशा एकूण १३४ गावे ठिकाणांचा समावेश आहे. 

ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचतगट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महिलांच्या स्वयंसहाय्यता बचतगट व महिलांच्या सहकारी संस्था यांना प्राथम्य क्रमानुसार नवीन रास्त भाव दुकानाकरीता ज्यांना अर्ज करणेचे असतील, त्यांनी संबंधित तहसिल कार्यालय, पुरवठा शाखा यांच्याकडे संपर्क साधावा व विहीत मुदतीत आवश्यक त्या कागदपत्रांसह तहसिलदार यांचेकडे अर्ज सादर करावेत. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असेही कळविण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket