अपक्ष शिवानीताई कळसकरांचा निर्धार : “वॉर्डचा सर्वांगीण विकासच ध्येय”
सातारा प्रतिनिधी (अली मुजावर)छत्रपती शिवरायांना अभिवादन करत “मी रडणारी नाही, लढणारी आहे” असा निर्धार व्यक्त करत अपक्ष उमेदवार शिवानीताई प्रीतम कळसकर यांच्या प्रचारमोहीमेची जोरदार सुरुवात झाली. वॉर्डमध्ये घेतलेल्या प्रचारफेरीस नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत “विजयी व्हा” अशा शुभेच्छांचा वर्षाव केला.
“नेतृत्व वयाने नाही, कर्तृत्वाने ओळखले जाते”, असे सांगत शिवानीताईंच्या नेतृत्वगुणांची सातारकरांनी दखल घेतली. श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या आशीर्वादाने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून, विकासाच्या आश्वासनांसह नागरिकांसमोर भक्कम भूमिका मांडली.
वॉर्डमधील महिलांसाठी रोजगारनिर्मिती, तसेच रस्ते–वीज–पाणी या मूलभूत सुविधांच्या अडचणींचे समाधान करत सर्वांगीण विकास साधणे हेच माझे ध्येय, असे शिवानीताई कळसकर यांनी यावेळी स्पष्ट केले.शिवानीताईंच्या या झंझावाती प्रचारामुळे स्थानिक निवडणुकीत मोठी चर्चा रंगली असून, पुढील काही दिवसांत प्रचार अधिक वेग पकडण्याची शक्यता आहे. सातारा शहर नगरपालिका 2025 निवडणुकीकरिता अपक्ष उमेदवार शिवानीताई प्रीतम कळसकर यांना नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे.




