Home » Uncategorized » क्राईम डायरी » अनवडी तालुका वाई गावात विहिरीत अज्ञात पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळला

अनवडी तालुका वाई गावात विहिरीत अज्ञात पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळला

अनवडी तालुका वाई गावात विहिरीत अज्ञात पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळला

वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)पुणे सातारा राष्ट्रीय महामार्ग लगत असणाऱ्या वाई तालुक्यातील अनवडी गावाच्या हद्दीतील रुपा नावाच्या शिवारात असणार्या एका विहीरीत अज्ञात अंदाजे ४५ ते ५० वय असणार्या पुरुष जातीच्या व्यक्तीचा मृतदेह आढळला असून त्या व्यक्तीचा घातपात झाला की अपघात या चर्चेने जोशीविहिर,अनवडी, ओझर्डे , शिरगांव, धोम पुनर्वसन,  परिसरात या घटनेने खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती गावचे पोलिस पाटील दिपक गीरी यांनी भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनी रमेश गर्जे यांना दिली . घटनेचे गांभीर्य ओळखून गर्जे यांनी तातडीने आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन घटनास्थळावर जाऊन भेट देऊन पाहणी केली .या घटनेची माहिती जिल्हा पोलिस प्रमुखांनसह वाईचे डिवाय एसपी बाळासाहेब भालचीम आणी एलसीबीला देण्यात आली. घटना स्थळाला बाळासाहेब भालचीम यांनी भेट देऊन रमेश गर्जे यांना तपासासाठी आवश्यक मार्गदर्शन केले .

यातील संशयीतांच्या शोधासाठी भुईंज पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

     जोशीविहिर जवळ असणाऱ्या अनवडी गावातील शिवारात  डोंगर  पायथ्याशी असलेल्या एका विहिरीत सोमवारी सकाळी शेतकऱ्यास पाण्यावर तरंगणाऱे पुरुष जातीचे प्रेत पाहिले त्यानंतर त्यांनी गावचे पोलीस पाटील दिपक गिरी गोसावी यांच्या मार्फत भुईंज पोलिसांशी  संपर्क साधला नंतर घटनास्थळी सहाय्यक  पोलिस निरीक्षक रमेश गर्जे व एलसीबीच्या टीम ने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला व ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले पण रात्री उशिरापर्यंत ओळख पटली नाही .त्याच्या अंगात जीन्स पॅंट असून खिशात काही आढळून आले नाही,त्या व्यक्तीचा अपघात की घातपात  त्या दृष्टीने सपोनी रमेश गर्जे व सहकारी अधिकारी व डिबी पथक तपास करीत आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

स्वर श्रद्धांजली आदर्श उपक्रम:शिरिष चिटणीस गायनसेवेच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त

Post Views: 29 स्वर श्रद्धांजली आदर्श उपक्रम:शिरिष चिटणीस गायनसेवेच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त सातारा| दिवंगत व्यक्तींबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी स्वर श्रद्धांजलीच्या

Live Cricket