Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » एलआयसीच्या योजनांद्वारे जीवन सुखकर करावे – अनिल देव

एलआयसीच्या योजनांद्वारे जीवन सुखकर करावे – अनिल देव

एलआयसीच्या योजनांद्वारे जीवन सुखकर करावे – अनिल देव

वाई, दि. 31– भारतीय जीवन बिमा निगम अर्थात एलआयसी आँफ इंडीयाच्या वतीने जीवन विमा योजनांमध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत. प्रत्येक भारतीय नागरिकाने स्वतःसाठी व आपल्या कुटुंबासाठी एकातरी विमा योजनेमध्ये गुंतवणूक करून आपण व आपले कुटुंब संरक्षित केले पाहिजे, असे आवाहन दि वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष अनिल देव यांनी केले.

एलआयसीचा स्थापना सप्ताह नुकताच साजरा करण्यात आला. त्यामध्ये एलआयसीची काँर्पोरेट एजन्सी म्हणून काम करणारी दि वाई अर्बन बँकेतील कर्मचा-यांनी 60 नवीन पाँलीसी सुरू करून एलआयसीच्या बचत व विमा उपक्रमास मोलाची साथ दिली. त्याबद्दल एलआयसीचे विपणन व्यवस्थापक महेश कुलकर्णी, सहाय्यक शाखा व्यवस्थापक अजित बोराटे यांच्या हस्ते बँकेस सन्मानचिन्ह देण्यात आले. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष अनिल देव बोलत होते. बँकेचे उपाध्यक्ष डाँ. शेखर कांबळे यांनी बँकेच्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. बँकेमध्ये एलआयसीच्या विविध गुंतवणूक योजना उपलब्ध असल्याचे सांगितले. 

श्री. महेश कुलकर्णी यांनी बँकेने काँर्पोरेट एजन्सीच्या माध्यमांतून स्थापना सप्ताहामध्ये भरघोस पाँलीसी रक्कम मिळविल्याबद्दल बँकेचे संचालक मंडळ व अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले. तसेच एलआयसीची रू. 50 हजार बचतीची छोटी बचत व विमा योजनेविषयी माहिती सांगितली. मुलांसाठी सुरू असलेली इंडेक्स प्लस विमा योजना याबाबतची माहिती दिली. यामध्ये एसआयपीप्रमाणे 5 वर्षे बचत करून भरघोस परतावा घेता येत असल्याचे सांगितले.

याप्रसंगी संचालक विवेक पटवर्धन, माधव कान्हेरे, अँड. बाळकृष्ण पंडीत, रमेश ओसवाल, काशीनाथ शेलार, अशोक लोखंडे, मकरंद मुळ्ये, अँड. सुनिती गोवीत्रिकर, चंद्रकांत गुजर, सौ. ज्योती गांधी, प्रीतम भुतकर, स्वप्नील जाधव, महेश राजेमहाडीक आदी व मान्यवर उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद कुलकर्णी, सरव्यवस्थापक चंद्रशेखर काळे यांनी एलआयसी अधिकारी यांचे स्वागत केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अजिंक्यतारा गणेश मंडळाचा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा सोहळा झाला सदाबहार आणि नेटका

सातारच्या मिठालालच्या पालक पुरीची ‘मेजवानी ‘.. पुण्याच्या लावण्यावती ‘अप्सरेचा ‘ ठसका..! अजिंक्यतारा गणेश मंडळाचा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा सोहळा झाला

Live Cricket