Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » अनहद अभिवाचनाचा आगळा वेगळा उपक्रम

अनहद अभिवाचनाचा आगळा वेगळा उपक्रम

अनहद अभिवाचनाचा आगळा वेगळा उपक्रम

डॉ.निर्मोही फडके, योगेश केळकर,वंदना गुजरे यांचे सादरीकरण

सातारा-डॉ. निर्मोही फडके यांनी करोना कालावधीत लिहिलेल्या विविध लेखांचे अभिवाचन करणारा आगळा प्रयोग दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहात सादर झाला आम्ही पुस्तकप्रेमी समूह आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

रंगायन आर्ट्स प्रस्तुत अनहद या कार्यक्रमांतर्गत डॉ. निर्मोही फडके यांनी लिहिलेल्या विविध लेखांचे संकलन व दिग्दर्शन करून योगेश केळकर यांनी संवाद रूपात अभिवाचनाच्या माध्यमातून हे लेखन वाचकांसमोर सादर केले. वंदना गुजरे यांच्यासमवेत झालेल्या या अभिवाचनाच्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमामुळे उपस्थित रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले.

डॉ. निर्मोही फडके यांनी लिहिलेल्या तीस लेखांपैकी दहा लेखांची निवड करून, त्यांचे संकलन करून योगेश केळकर यांनी वंदना गुजरे यांच्या सहकार्याने अभिनव अभिवाचन सादर केले.

डॉ. निर्मोही फडके यांचे शब्द, त्याला योगेश केळकर आणि वंदना गुजरे यांनी चढवलेला आगळावेगळा अभिनयसाज यामुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. कार्यक्रमाच्या सादरीकरणानंतर श्रोत्यांशी मुक्त चर्चाही झाली आणि या कार्यक्रमामागील आपली भावना आणि संकल्पना लेखिका डॉक्टर निर्मोही फडके आणि दिग्दर्शक योगेश केळकर यांनी स्पष्ट केली. एका व्यक्तीच्या मनातील भावनांचे द्वंद्व, त्यातून मनात निर्माण होणारे प्रश्न आणि त्या प्रश्नांना त्या व्यक्तीच्या आतल्या आवाजानेच केलेले निरसन, ही ह्या लेखनामागील मूळ संकल्पना आहे. माणूस आणि निसर्ग ह्यांचा अनुबंध किती महत्त्वाचा आहे, हे ह्या ललित लेखांच्या उत्तम अभिवाचनातून स्पष्ट झाले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कूपर कॉर्पोरेशनचे चीफ ह्यूमन रिसोर्स ऑफिसर नितीन देशपांडे आणि दैनिक प्रभातचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे उपस्थित होते. या दोघांनीही आपल्या भाषणामध्ये या उपक्रमाचे कौतुक केले.ॲड. सीमांतनी नुलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि आभारही मानले. 

या वेळी पुस्तक प्रेमी समूहाचे समन्वयक श्रीराम नानल, दीपलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन शिरीष चिटणीस, ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके, लेखक पद्माकर पाठकजी, स्वाती राऊत आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कृतज्ञता सोहळ्याच्या माध्यमातून तब्बल ३९ वर्षांनी गुरु-शिष्यांची अविस्मरणीय भेट

Post Views: 71 कृतज्ञता सोहळ्याच्या माध्यमातून तब्बल ३९ वर्षांनी गुरु-शिष्यांची अविस्मरणीय भेट श्री मुधाईदेवी विद्‌यामंदिर देऊरच्या सन १९८६ च्या दहावीच्या

Live Cricket