अमित कदम शिवसेनेकडून(ठाकरे गट )लढणार
सातारा दि. २७ : सातारा – जावली मतदारसंघात महाविकास आघाडीने अखेर अमित कदम यांना निवडणूक आखाड्यात उतरवले आहे. अमित कदम यांनी मातोश्री येथे निवडक कार्यकर्त्यांसह शिवसेनेत (ठाकरे गट) प्रवेश केला. शिवसेनेने त्यांना सातारा जावली मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी एबी फॉर्म दिला आहे.
महायुतीकडून भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित झाली असल्याने आ. शिवेंद्रसिंह भोसले यांनी मतदारसंघात प्रचार सुरू करून त्यात आघाडी घेतली. महाविकास आघाडीकडून उमेदवारी कुणाला मिळणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या. अखेर अमित कदम यांच्या गळ्यात शिवसेनेने उमेदवारीची माळ घातली. त्यामुळे आता सातारा विधानसभा मतदारसंघात शिवेंद्रसिंहराजे भोसले विरुद्ध अमित कदम असा दुरंगी सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अमित कदम यांना मानणारा युवा वर्ग जमेची बाजू असून त्यांना निवडणुकीत याचा फायदा होणार आहे.