Home » राजकारण » आम्ही जे जे बोललो, ते ते खरं करून दाखवलं आमदार मकरंदआबा पाटीलः ‘किसन वीर’चे बॉयलर अग्नि प्रदिपन उत्साहात

आम्ही जे जे बोललो, ते ते खरं करून दाखवलं आमदार मकरंदआबा पाटीलः ‘किसन वीर’चे बॉयलर अग्नि प्रदिपन उत्साहात

आम्ही जे जे बोललो, ते ते खरं करून दाखवलं आमदार मकरंदआबा पाटीलः ‘किसन वीर’चे बॉयलर अग्नि प्रदिपन उत्साहात

दि. १३/१०/२४: किसन वीर कारखान्याच्या निवडणुकीत व कारखान्याच्या अनुषंगाने झालेल्या इतर वेगवेगळ्या कार्यक्रमात मी सातत्याने

सांगत होतो की, शेतकऱ्यांची सन २०२०-२१ मधील थकीत ऊस बील आम्ही देणार तसेच कारखानाही सुस्थितीत आणणार, याबाबतचे पहिले पाऊल पडलेले असून वार्षिक मिटींगला दिलेल्या शब्दानुसार १५ ऑक्टोंबरपर्यंत सन २०२०-२१ मधील शेतकऱ्यांची थकीत ऊस बील खात्यावर वर्ग करणार. याची सुरूवात आज विजयादशमीच्यानिमित्ताने शेतकऱ्यांना अॅडव्हाईस देऊन करीत आहोत. त्यामुळे आम्ही जे जे बोललो, ते ते खरं करून दाखवलं असल्याचे गौरवोदगार कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांनी काढले. 

किसन वीर साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदिपन कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अर्चना मकरंद पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील, कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, वाई तालुका सुतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब कदम, खंडाळा कारखान्याचे व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे, बाळासाहेब सोळस्कर, दत्तानाना ढमाळ, रामराव लेंभे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार पाटील पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार हे सत्तेत सामील झाल्याने व आपण त्यांच्याबरोबर राहिल्याने

किसन वीर व खंडाळा कारखान्याला शासनाकडून ४६७ कोटी रूपयांचे कर्ज मंजुर झाले. यामुळे दोन्ही कारखान्यावरील लिलावाची प्रकिया थांवली व शेतकऱ्यांच्या मालकीचे कारखाने वाचविण्यात आमचे संचालक मंडळ यशस्वी ठरले. सन २०२०-२१ मधील थकीत ऊस बीलाची रक्कम जवळपास ५१ कोटी व सन २०२१-२२ मधील ५ कोटी रूपये देय्य होतो. किसन वीर कारखान्यावर एवढे प्रकल्प असतानादेखील हा कारखाना फक्त आणि फक्त मागील संचालक मंडळाच्या भ्रष्टचारी व अनियिमित कारभारामुळे अडचणीत आणला होता. कारखाना बंद पडण्याच्या अवस्थेत होता. मात्र आपल्या सर्वाच्या आग्रहामुळे कारखाना ताब्यात घेतला. शेतकऱ्यांनी दिलेल्या भाग भांडवलामुळे आपण कोणत्याही बँकेचे सहाय्य न घेता हंगाम सुरू केले. नुसते सुरू केले नाहीत तर मागील दोन्ही हंगामातील शेतकऱ्यांचे, तोडणी वाहतुक व व्यापारी देणी देण्यास समर्थ ठरलो. शेतकऱ्यांनीही आता खऱ्या अर्थाने विचार करण्याची गरज आहे, की काहीही नसताना आमच्या संचालक मंडळाने तुमचा एक रूपायाही बुडविलेला नाही आणि आता तर आपल्याकडे थकहमीचे पैसे आलेले आहेत. आता बँकांची सेटलमेंट होऊन वित्तपुरवठाही सुरू होणार आहे. त्यामुळे नजिकच्या काळात किसन वीर व खंडाळा कारखान्याला पहिले दिवस येणार व ते दिवस येण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करीत राहणार आहोत. आपल्याला मिळालेल्या थकहमीची परतफेड आठ वर्षामध्ये करावयाची आहे. यासाठी दोन्ही कारखान्याचे मिळून दहा लाख मेट्रिक टन गाळप झाले पाहिजे व असे झाल्यास नजिकच्या ४ ते ५ वर्षात शेजारील सोमेश्वर कारखान्याचा जो भाव असेल तोच आपलाही असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला परिपक्क झालेला संपुर्ण ऊस आपल्याच कारखान्याला देऊन कारखान्याला व पर्यायाने तुम्हाला सुगीचे दिवस आणण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करून सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.

प्रमोद शिंदे म्हणाले की, कारखान्याला चांगले नेतृत्व प्राप्त झाले की काय बदल होतो ते आपण पाहत आहात. जो कारखाना बंद पडुन लिलाव होण्याच्या मार्गावर होता, त्याला आमदार मकरंदआबांसारखे सक्षम नेतृत्व मिळाल्यानंतर कारखान्यात काय बदल होतो ते आपण अनुभवत आहात. मकरंदआबा व नितीनकाकांचे सातत्य व प्रयत्नामुळेच कारखान्याला शासनाकडून आर्थिक मदत मिळालेली आहे. आबांच्यामुळेच आपल्या वाई व खंडाळा तालुक्याला दुष्काळनिधी प्राप्त झाला तसेच मतदार संघात जी विकासाची नांदी होत आहे ती फक्त आबांच्यामुळेच होत आहे. त्यामुळे आपण सर्वांना या नेतृत्वाला भक्कमपणे साथ देऊन त्यांच्या पाठीशी कायमपणे उभे राहण्याचे आवाहनही केले. 

बॉयलर अग्नि प्रदिपन प्रकाश लक्ष्मणराव धुरगुडे व सौ. रूपाली प्रकाश धुरगुडे (रा. भिरडाचीवाडी, वाई), रविंद्र जयसिंग जमदाडे व सौ. अनिता रविंद्र जमदाडे (रा. फुलेनगर, वाई), शिवाजी भिकू इथापे व सौ. अंजना शिवाजी इथापे रा. देगांव, वाई), श्रीरंग सगू शिंदे व सौ. मालन श्रीरंग शिंदे (रा. बर्गेवाडी, कोरेगांव), गंगाराम बाजीराव भिलारे व सौ. मंदा गंगाराम भिलारे (रा. शेते, जावली), बाजीराव कोंडीबा जाधव व सौ. मंगल बाजीराव जाधव (रा. गोवे, सातारा) या उभयतांच्या हस्ते बॉयलरचे विधीवत पुजन करण्यात आले. कार्यक्रमास कारखान्याचे संचालक दिलीप पिसाळ, सचिन साळुंखे, रामदास गाढवे, हिंदुराव तरडे, किरण काळोखे, रामदास इथापे, संदीप चव्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, संजय फाळके, शिवाजीराव जमदाडे, संजय कांबळे, हणमंत चवरे, सुशिला जाधव, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, सातारा सहकारी शेती औद्योगिक तोडणी व वाहतुक सोसायटीचे अध्यक्ष बबनराव साबळे, उपाध्यक्ष अजय कदम, संचालक अरविंद कदम, प्रतापराव पवार, विजय इथापे, नितीन निकम, रमेश गायकवाड, पोपट जगताप, भैय्यासाहेब डोंगरे, शुभम पवार, राजेंद्र सोनावणे, नारायण नलवडे, विक्रम पिसाळ, चरण गायकवाड, भारत चव्हाण, आनंद चिरगुटे, अमृत गोळे, अब्दुल इनामदार, शिवाजी बाबर, अॅड. शामराव गाढवे, अशोकराव धायगुडे, सुरेश साळुंखे, चंद्रकांत फडतरे, शशिकांत पवार, कुमार बाबर, यशवंत जमदाडे, सुरेश साळुंखे, संपतराव शिंदे, मंगेश घुमाळ, प्रकाश चव्हाण, चंद्रकात फडतरे, कारखाना कार्यक्षेत्रातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

किसन वीर कारखान्याला गतवैभव मिळवून देणारे नेतृत्व म्हणजे आमदार मकरंदआबा पाटील-ऊस उत्पादक सभासद

किसन वीर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील व जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील यांच्या बोलण्यावर आम्हाला विश्वास होता. परंतु आम्हाला सन २०२०-२१ मधील थकीत ऊस बील मिळेल की नाही याची खात्री नव्हती. परंतु काही दिवसांपुर्वी शासनाकडून किसन वीर व खंडाळा कारखान्याला थकहमीची रक्कम मिळाली व आमदार मकरंदआबा पाटील यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना शब्द दिलेला होता की, १५ ऑक्टोंबरपुर्वी शेतकऱ्यांना सन २०२०-२१ मधील थकीत ऊस बील देणार. त्याप्रमाणे आज विजयादशमीच्या मुहूर्तावर आम्हा शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात ऊस बीलाचे अॅडव्हाईस दिल्याने आम्ही शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थानं सिमोल्लंघन केल्याचा आनंद होत आहे. त्यामुळे आम्हाला आता खात्री आहे की, किसन वीर कारखान्याला गतवैभव मिळवून देणारे नेतृत्व म्हणजे आमदार

मकरंदआबा पाटील हेच होय, अशी प्रतिक्रिया एका ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दिली.

२०२०-२१ ची थकीत रक्कम मिळाल्याने आमचा संपुर्ण ऊस किसन वीरलाच घालणार

शेतकऱ्यांची थकीत बीले मिळण्यास सुरुवात झाल्याने व मागील हंगामातील सर्व रक्कम मिळाल्याने कारखान्यावर विश्वास वाढलेला असुन आम्हाला आता खात्री वाटत आहे की, आता आमच्या घामाला योग्य दाम नक्कीच मिळेल, त्यामुळेच आम्ही आमचा संपुर्ण ऊस फक्त किसन वीरलाच गाळपासाठी देणार असल्याचे शेतकरी बोलत होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी

Post Views: 72 सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी सातारा:करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव

Live Cricket