कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » एकेज कॉमर्स अकॅडमी, सातारा – सीए अंतिम परीक्षेत विद्यार्थ्यांचे चमकदार यश

एकेज कॉमर्स अकॅडमी, सातारा – सीए अंतिम परीक्षेत विद्यार्थ्यांचे चमकदार यश

एकेज कॉमर्स अकॅडमी, सातारा – सीए अंतिम परीक्षेत विद्यार्थ्यांचे चमकदार यश

सातारा-इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) तर्फे घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट (CA) फाइनल परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून, साताऱ्यातील “एकेज कॉमर्स अकॅडमी”च्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन करून साताऱ्याचा मान उंचावला आहे.

जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत एकेजच्या विद्यार्थ्यांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.प्रज्वल परदेशी, वेदांगी आफळे, अनुज दोशी, देवराज शिंदे, अथर्व दडस, प्रेरणा ओसवाल आणि उज्वल पी.एस. या विद्यार्थ्यांनी सीए फाइनल परीक्षा उत्तीर्ण होऊन एकेज अकॅडमीच्या यशगाथेत ऐतिहासिक पान जोडले आहे.तसेंच अनेक विध्यार्थी सीए इंटरमीडिएट व सीए फाऊंडेशन परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

प्राध्यापक सीए आनंद कासट यांनी “एकेज कॉमर्स अकॅडमी” स्थापन करून सीए फाऊंडेशन (CA Foundation),सीए इंटरमीडिएट (CA Intermediate),सीए फायनल (CA Final) अल्प दरात दर्जेदार शिक्षण सातारा मध्ये शिक्षण उपलब्ध करून दिले.

प्राध्यापक आनंद कासट यांच्या मार्गदर्शनामुळे पश्चिम महाराष्ट्रात अनेक विद्यार्थ्यांनी सीए होण्याचा बहुमान मिळविला आहे.पश्चिम महाराष्ट्रात एकेज अकॅडमीला ‘सीए फॅक्टरी’ म्हणून ओळख मिळाली आहे.या यशानंतर प्रा.कासट यांनी सांगितले,“साताऱ्यात राहूनही सीए होण्याचे स्वप्न साकार करता येते, हे या विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. मेहनत, मार्गदर्शन आणि सातत्य हेच यशाचे खरे रहस्य आहे.”

एकेज कॉमर्स अकॅडमीच्या या ऐतिहासिक यशामुळे सातारा शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाचा क्षण निर्माण झाला आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket