कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » अजित पवार जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले की, “तुम्ही गाड्या घ्या ना कलेक्टर. मी आत्ताच्या आता इथे ऑर्डर देतो,” असं म्हणत दोन गाड्यांची ऑर्डर देऊन टाकली.

अजित पवार जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले की, “तुम्ही गाड्या घ्या ना कलेक्टर. मी आत्ताच्या आता इथे ऑर्डर देतो,” असं म्हणत दोन गाड्यांची ऑर्डर देऊन टाकली. 

अजित पवार जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले की, “तुम्ही गाड्या घ्या ना कलेक्टर. मी आत्ताच्या आता इथे ऑर्डर देतो,” असं म्हणत दोन गाड्यांची ऑर्डर देऊन टाकली. 

कोल्हापूर -राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चांगलंच झापलं. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या वाहनांच्या ताफ्याचे आगमन झाल्यानंतर गाडीतून उतरताच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ताफ्यात जुन्या गाड्या असल्याबद्दल विचारणा केली.

गाड्या काय झाल्या ओ कलेक्टर, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी तातडीने नव्या गाड्यांचा प्रस्ताव पाठवा, त्याला लगेच मंजुरी देऊन टाकतो, असं म्हणत अजित पवारांनी गाडी बदलण्याच्या सूचना केल्या आहेत. कोल्हापूर दौऱ्यात अजित पवारांच्या सेवेत देण्यात आलेली गाडी ही खराब असल्याचं म्हणत अजित पवार चांगलेच भडकलेले बघायला मिळाले.

उपमुख्यमंत्री पवार गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर लगेचच पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून गाड्या काय झाल्या ओ कलेक्टर ? अशी विचारणा केली. गाड्या नसतील, तर नव्या गाड्या घेण्यासाठी प्रस्ताव देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. लगेचच त्यास मंजुरी देण्याची ग्वाही दिली. त्यावर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पाच गाड्यांचा प्रस्ताव यापूर्वीच दिल्याचे सांगितले.ताफ्यातील वाहनांबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतानाही पुनरुच्चार केला. ते म्हणाले, प्रशासनाकडे तीनच वाहने आहेत, त्यापैकी डीव्ही कार परभरणीला पाठवली आहे. उरलेल्या दोनमध्ये एकच गाडी उपलब्ध आहे. गेल्यावेळीच मी नवीन वाहने घेण्याबाबतच्या सूचना केल्या होत्या. मंत्री, शासनाचे प्रतिनिधी किंवा न्यायाधीश दौऱ्यावर आल्यानंतर त्यांना सुस्थितीतील वाहने उपलब्ध झाली पाहिजेत. म्हणून आता पाच वाहनांचा प्रस्ताव दिला असून, तो तातडीने मंजूर करू, असाही अजित पवारांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket