बावधनचा पैलवान पुन्हा सज्ज — तानाजी कचरे यांचा विजयाचा बिगुल!” मावा केक खायचा तर फक्त देवत्व बेकर्सचा लाखोंच्या जीभेवर अधिराज्य; आनंदाचेक्षण होताहेत खास पाचगणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान भवन स्थापनेची मागणी — सामाजिक न्याय संस्थेकडून मुख्यमंत्री व मंत्री मकरंद पाटील यांना निवेदन मी लढणार आणि जिंकणार!” — भिलार गणातून पूनम गोळे यांची जोरदार उमेदवारी, महिलांच्या न्यायहक्कांसाठी ठाम भूमिका  तुमचे पैसे बँकेत बेवारस पडले, ओळख पटवा व घेऊन जा. करंजे येथे उपस्थित रहा व पैसे परत मिळवा गट गण आरक्षणामुळे महाबळेश्वरच्या राजकारणात बदल — मंत्री मकरंद आबा पाटील नव्या चेहऱ्यांना संधी देणार का?
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » एअर स्ट्राइकनंतर अवघा देश भारतीय लष्कराच्या पाठीशी एकवटला भारताकडून एअर स्ट्राईक

एअर स्ट्राइकनंतर अवघा देश भारतीय लष्कराच्या पाठीशी एकवटला भारताकडून एअर स्ट्राईक

एअर स्ट्राइकनंतर अवघा देश भारतीय लष्कराच्या पाठीशी एकवटला भारताकडून एअर स्ट्राईक 

भारताकडून एअर स्ट्राईक

 पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानस्थित दहशवाद्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे चोख प्रत्युत्तर दिले आहे. बुधवारी मध्यरात्री भारतीय लष्कराने पाकिस्तानातील ९ दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले आहे. 

दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दोन आठवड्यांनंतर हे भारतीय लष्कराने ही कारवाई केली आहे. भारतीय लष्कराच्या या कारवाईनंतर देशभरातून समाधन व्यक्त केले जात आहे. दरम्यान भारताने दिलेल्या या प्रत्युत्तराचे सर्वसामान्यांसह राजकीय वर्तुळातील नेत्यांनी भारतीय लष्कराचे कौतुक केले आहे.

या हवाई हल्ल्यानंतर देशाचे संरक्षण मंत्री यांनी सर्वप्रथम एक्सवर एका ओळीची पोस्ट केली. त्यामध्ये त्यांनी “भारत माता की जय”, असे म्हटले आहे. याचबरोबर काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही, “आपल्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे. जय हिंद!”, अशी पोस्ट केली आहे.

दुसरीकडे जम्मू आणि काश्मीरमध्येही भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ पार पाडल्यानंतर स्थानिकांनी ‘भारतीय सेना झिंदाबाद’ आणि ‘भारत माता की जय’ च्या घोषणा दिल्या आहेत. तर राजस्थानमध्ये नागरिकांनी फटाके फोडत लष्कराने पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईचे स्वागत केले आहे. सोशल मीडियावर याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील बहावलपूर, मुरीदके, गुलपूर, लष्कर कॅम्प सवाई, बिलाल कॅम्प, कोटली, बरनाल कॅम्प, सरजाल कॅम्प, मेहमूना कॅम्प येथील तळ उडवण्यात आले आहेत. हे तिन्ही सैन्य दलांच मिळून जॉइंट ऑपरेशन होतं. भारतीय सैन्य, एअर फोर्स आणि नौदल तिघांनी मिळून ही Action घेतली आहे. या कारवाईत भारतात निरपराधांचा बळी घेणाऱ्या लश्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनच्या ठिकाणांना उद्धवस्त केलय. स्वत: पीएम मोदी यांनी या ऑपरेशन सिंदूर नाव ठेवलं होतं.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बावधनचा पैलवान पुन्हा सज्ज — तानाजी कचरे यांचा विजयाचा बिगुल!”

Post Views: 270 “बावधनचा पैलवान पुन्हा सज्ज — तानाजी कचरे यांचा विजयाचा बिगुल!” बावधन गण सर्वसाधारण झाल्याने तानाजी कचरे पुन्हा

Live Cricket