Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » अहद नालबंद याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या पालकांची शाळेस डायसची भेट

अहद नालबंद याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या पालकांची शाळेस डायसची भेट

अहद नालबंद याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या पालकांची शाळेस डायसची भेट

केळघर, ता:६:जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा केळघर येथील विद्यार्थी अहद नालबंद याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या पालकांनी शाळेस डायसची भेट दिली. व विद्यार्थ्यांना खाऊ वाटून आपल्या मुलाचा वाढदिवस आगळ्या पद्धतीने साजरा केला.

नालबंद कुटुंबीय दरवर्षी मुलाच्या वाढदिवसानिमित्त शाळेला विविध वस्तू भेट देत असतात . मागील वर्षीही कुंडया व विविध प्रकारच्या झाडांची रोपे शाळेला भेट दिली होती . मुलांच्या वक्तृत्व गुणांना मदत होण्यासाठी त्यांनी शाळेला डायस भेट दिले .

शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका शोभा धनावडे यांच्या हस्ते पालक आयाझ नालबंद व शहनाझ नालबंद यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन बिरामणे, दीपक गायकवाड, सुचित्रा नेवसे, राहुल धनावडे, महंमद पठाण शाळा व्यवस्थापन समितीचे ,सदस्य उपस्थित होते .

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी

Post Views: 90 सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी सातारा:करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव

Live Cricket