मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य पाऊल; नचिकेत हायस्कूल पाचगणी येथे प्रवेश सुरू
पाचगणीतील नामांकित नचिकेत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू
पाचगणी प्रतिनिधी :महाराष्ट्रातील दर्जेदार शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या पाचगणी येथील नचिकेत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष 2026–27 साठी इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती संस्थेच्या संचालकांनी दिली आहे.
सायन्स व कॉमर्स शाखेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे नचिकेत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज हे महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून सीबीएससी व राज्य मंडळ अभ्यासक्रमाची येथे उपलब्धता आहे. विद्यार्थ्यांसाठी निवासी (Hostel) प्रवेश व्यवस्था असून निवासी विद्यार्थ्यांसाठी व्हेज व नॉनव्हेज भोजनाची सुविधा देण्यात येते.
कॉलेजमध्ये अद्ययावत डिजिटल क्लासरूम, सुसज्ज लायब्ररी, अत्याधुनिक सायन्स व टेक्नॉलॉजी लॅब उपलब्ध आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी JEE व NEET परीक्षांची संपूर्ण तयारी करून घेतली जाते. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येतो.

विद्यार्थ्यांसाठी डिफेन्स ट्रेनिंग, बेसिक NCC प्रशिक्षण, तसेच आर्चरी, मल्लखांब, रायफल शूटिंग, बॉक्सिंग, कराटे यांसारख्या क्रीडा प्रकारांची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय फुटबॉल, हॉलीबॉल, क्रिकेटसाठी स्वतंत्र व प्रशस्त क्रीडांगण आहे. विद्यार्थ्यांसाठी विशेष बॅचेसचे आयोजनही केले जाते.
अनुभवी व पात्र शिक्षक वर्ग असल्यामुळे नचिकेत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा निकाल दरवर्षी शंभर टक्के लागतो. जागतिक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाचगणी शहरात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक करिअर घडविण्यासाठी नचिकेत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजला अनन्यसाधारण महत्त्व आहे.इच्छुक पालक व विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी लवकरात लवकर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.





