Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » बीबीए, बीसीए, एमबीए आणि एमसीए अभ्यासक्रमांसाठी ‘यशोदा’ मध्ये प्रवेश सुविधा केंद्र

बीबीए, बीसीए, एमबीए आणि एमसीए अभ्यासक्रमांसाठी ‘यशोदा’ मध्ये प्रवेश सुविधा केंद्र 

बीबीए, बीसीए, एमबीए आणि एमसीए अभ्यासक्रमांसाठी ‘यशोदा’ मध्ये प्रवेश सुविधा केंद्र 

प्रवेशासाठी सीईटी आवश्यक, ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची मुदत 25 जानेवारी पर्यंतच

व्यावसायिक आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेत असताना सीईटी प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक असतात. सिटी देणारे विद्यार्थीच शासनाच्या विविध शिक्षण शुल्क माफीच्या योजनांसाठी पात्र ठरत असतात. बहुतेक विद्यार्थ्यांना सीईटीच्या संदर्भातला मार्गदर्शन वेळेत न मिळाल्यामुळे ते एकतर प्रवेशापासून वंचित राहत असतात किंवा शिक्षण शुल्क माफीच्या योजनांपासून वंचित राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अथवा आर्थिक नुकसान होण्याचे संभाव्यता असते. त्यामुळे बारावी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध अभ्यासक्रमांसाठी विविध प्रकारच्या सीईटी महाराष्ट्र शासनाद्वारे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा केंद्रामार्फत घेतल्या जातात. 

चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता बारावी मध्ये शिकणारे विद्यार्थी जर बीबीए अथवा बीसीए अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणार असतील तर त्यांना सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी देणे बंधनकारक असणार आहे. गेल्या वर्षी या अभ्यासक्रमांच्या सीईटी साठी बहुतेक विद्यार्थ्यांनी आवेदन सादर न केल्यामुळे ते बीबीए, बीसीए अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकले नव्हते. अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आता सीईटी साठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये एमबीए आणि एमसीए या पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस ला देखील प्रवेश घेताना सीईटी देणं बंधनकारक असतं. अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश परीक्षेचा अर्ज भरण्याची अंतिम मुदत 25 जानेवारी पर्यंत आहे. सदस्य विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेसाठी आवेदन सादर करून परीक्षेची तयारी करणं क्रमप्राप्त आहे. बीबीए आणि बीसीए या अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची तारीख 10 फेब्रुवारी अशी आहे 

जर विद्यार्थी सामायिक प्रवेश परीक्षा देण्यापासून वंचित राहिला तर तो पुढे प्रवेशापासून किंवा शैक्षणिक शुल्क माफीच्या योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना शैक्षणिक अथवा आर्थिक नुकसानीला सामोरे जावं लागतं. म्हणूनच पदवी अथवा पदवी उत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सीईटी संदर्भात माहिती देण्याच्या उद्देशाने यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा येथे प्रवेश सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. सदरच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारची माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या प्रवेश केंद्राची स्थापना करण्यात आल्याचे यशोदा टेक्निकल कॅम्पस कडून सांगण्यात आले.

कित्येकदा विद्यार्थी हा प्रवेश प्रक्रिये संदर्भात बऱ्याच गोष्टींपासून अनभिन्न असल्याचे जाणवते, विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्र वेळेत उपलब्ध न केल्यामुळे देखील प्रवेशापासून अलिप्त राहावे लागते. आणि मग विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण होते. अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थी आणि पालकांनी तंत्रशिक्षण आणि व्यावसायिक शिक्षणातील कोणत्याही अभ्यासक्रमाची माहिती मिळवण्यासाठी यशोदा टेक्निकल कॅम्पसला भेट द्यावी असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.

प्रा.दशरथ सगरे ( यशोदा कुटुंब प्रमुख )

प्रवेश सुविधा केंद्र म्हणजे 

विद्यार्थ्यांना कोणत्याही तंत्रशिक्षण व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेत असताना सुरुवातीपासून म्हणजेच प्रवेश परीक्षेपासून ते आवश्यक असणाऱ्या प्रवेशासाठीच्या कागदपत्रांपर्यंत तसेच प्रवेश प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे जसे कागदपत्र तपासणी, गुणवत्ता यादी, स्कॉलरशिप साठीच्या योजना, केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचे स्वरूप अशा सर्व टप्प्यांवरील माहितीसाठी प्रवेश सुविधा केंद्र हे विद्यार्थी आणि पालकांसाठी मार्गदर्शन केंद्र म्हणून कार्य करत असते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

दाव्होस दौऱ्यावर टीका नव्हे, तर पारदर्शकतेची मागणी मागील MoU वर श्वेतपत्रिका जाहीर करा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

दाव्होस दौऱ्यावर टीका नव्हे, तर पारदर्शकतेची मागणी मागील MoU वर श्वेतपत्रिका जाहीर करा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

Live Cricket