Post Views: 966
अभिनेत्री प्रिया मराठे यांचे कर्करोगाने निधन
मुंबई | मराठीसह हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. प्रिया मराठे यांनी वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला असून त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रिया मराठे यांच्यावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात कर्करोगाशी संबंधित उपचार सुरू होते. मात्र कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरत रविवार, ३१ ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता त्यांचे मीरा रोड येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.





