Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » शैक्षणिक स्तर उंचविण्यासाठी एन.बी.ए मूल्यांकन होणे गरजेचे – प्रा. तौशिफ पाटील

शैक्षणिक स्तर उंचविण्यासाठी एन.बी.ए मूल्यांकन होणे गरजेचे – प्रा. तौशिफ पाटील 

शैक्षणिक स्तर उंचविण्यासाठी एन.बी.ए मूल्यांकन होणे गरजेचे – प्रा. तौशिफ पाटील 

एन.बी.ए मूल्यांकन विषयी गौरीशंकर मध्ये कार्यशाळा संपन्न ,राज्यभरातील 40 प्राध्यापकांचा सहभाग

लिंब -स्पर्धात्मक युगात दर्जात्मक व गुणात्मक शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना अद्यावत सुसज्ज सोयी सुविधांचा लाभ देऊन सक्षम घडविणे हे प्रथम महाविद्यालयाचे कर्तव्य आहे यासाठी महाविद्यालयाने एन.बी.ए मूल्यांकन करणे गरजेचे आहे असे मत आण्णाराव गुरुलिंगप्पा पाटील ( ए.जी)पॉलिटेक्निक सोलापूरचे तज्ञ प्रा. तौशिफ पाटील यांनी व्यक्त केले ते लिंब.ता. जि. सातारा येथील गौरीशंकर डी फार्मसी लिंब महाविद्यालयात एक दिवशीय राज्यस्तरीय एन बी ए मूल्यांकन प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते .

यावेळी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, प्राचार्य विजय राजे ,प्रा. सविता मोरे ,आण्णाराव गुरुलिंगप्पा पाटील पॉलिटेक्निकचे प्रा. समीर लिगाडे अदि प्रमुख उपस्थित होते .

प्रा.तौशिफ पाटील पुढे म्हणाले की नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासित गुणांना अभ्यासक्रमात प्राधान्यक्रम दिला आहे सक्षम मनुष्यबळ निर्मिती हे राष्ट्राचे धोरण आहे यासाठी विद्यार्थ्यांना तज्ञ प्राध्यापकांची गरज आहे महाविद्यालयात कार्यप्रणालीमध्ये सुसूत्रता व परिणामकारक निकाल येण्यासाठी एन.बी.ए मूल्यांकन आता बंधनकारक केले आहे.

 प्रा.समीर लिगाङे म्हणाले की शैक्षणिक क्षेत्रातील बदलती समीकरणे पाहता प्रत्येक घडामोडीत सक्षम राहणे गरजेचे आहे एन.बी.ए मूल्यांकनाचे महत्त्व शिक्षण प्रणालीमध्ये अधिक असून ज्या महाविघालयाचे मूल्यांकन होते तेथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये नवा आत्मविश्वास पहायला मिळतो.

 एन बी ए मूल्यांकन कार्यशाळेत सातारा, सांगली. कोल्हापूर, सोलापूर ,मिरज, कवठेमहाकाळ, कराड ,मायणी, फलटण, अकलूज, इस्लामपूर येथील 40 प्राध्यापकांनी सहभाग घेतला होता .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शिवानी पोळ यांनी केले व आभार प्रा.सविता मोरे यांनी मानले

 एन बी ए मूल्यांकनाची शैक्षणिक क्षेत्रातील उपयुक्तता व त्याचे भविष्यात होणारे फायदे याविषयी सखोल माहिती कार्यशाळेत देण्यात आली नव्याने शैक्षणिक क्षेत्रात होणाऱ्या बदलास शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कसे सामोरे गेले पाहिजे याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले तसेच एनबीए मूल्यांकनासाठी आधुनिक अँप द्वारे कशी माहिती प्राप्त होते व ते किती परिणामकारक आहे याची माहिती विशद केली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वहागांव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी श्री.धनंजयराव वसंतराव पवार यांची बिनविरोध निवड

Post Views: 67 वहागांव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी श्री. धनंजयराव वसंतराव पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कराड प्रतिनिधी (सुनील पाटील )-

Live Cricket