पांचगणीतील बिलिमोरिया हायस्कूलमध्ये ‘आरंभ’ फेस्टिव्हलचे आयोजन
२३, २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी रंगणार महोत्सव
पाचगणी प्रतिनिधी -कृतियुक्त शिक्षण आणि कलेतून ज्ञानप्राप्ती हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून व्यवसायाभिमुख शिक्षण देणाऱ्या बिलिमोरिया हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘आरंभ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. बिलिमोरिया हायस्कूल मैदानावर शुक्रवार (दि.२३) रोजी या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
तर या तीन दिवसाच्या महोत्सवात मान्यवर कलाकारांचे कार्यक्रम होणार आहेत. भारतातील पहिल्या दहा उत्कृष्ट निवासी शाळांमधील ही शाळा विद्यार्थ्यांचे संकल्पना स्पष्टीकरण,अध्ययन निष्पत्ती आधारित शिक्षण यावर भर देते.
तीन दिवस होणाऱ्या या महोत्सवासाठी विद्यार्थ्यांचे पालक तसेच परिसरातील नागरिक येणार असून या महोत्सवाची पूर्ण तयारी झाली आहे. यंदाच्या आरंभ महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे भारतातील नामांकित युनिव्हर्सिटी ह्या महोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी याचा जरूर लाभ घ्यावा अशी विनंती शाळेच्या वतीने करण्यात आली आहे.




