Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » आपला सन्मान करणं हे माझं सौभाग्य आमदार मनोजदादा घोरपडे.

आपला सन्मान करणं हे माझं सौभाग्य आमदार मनोजदादा घोरपडे.

आपला सन्मान करणं हे माझं सौभाग्य आमदार मनोजदादा घोरपडे.

जागतिक महिला दिनानिमित्त मसूर येथे सन्मान सोहळा संपन्न 

 कराड उत्तरचे आमदार मा.मनोजदादा घोरपडे यांच्याकडून स्वाभिमानी महिला सखी मंच यांच्यावतीने मसूर येथील अश्वमेघ मंगल कार्यालयामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षक, अशा सेविका, बचत गट प्रेरिका यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावेळी आपण सर्वांनी कोविड काळामध्ये संपूर्ण जग थांबलेले असताना आपण घरोघर जाऊन कोविड रुग्णाची सेवा केली स्वतःच्या कुटुंबाबरोबरच समाजाला पुढे घेऊन जाण्याची ताकद आपल्यामध्ये आहे आणि आपला सन्मान करणे ही मी माझे सौभाग्य समजतो असे प्रतिपादन उत्तरचे आमदार मा. मनोजदादा घोरपडे यांनी केले यावेळी स्वाभिमानी महिला सखी मंच मार्गदर्शिका मंगलताई घोरपडे,अध्यक्ष समता घोरपडे, कार्याध्यक्ष तेजस्विनी घोरपडे, कराड बीडिओ नागेश पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती.   

         यावेळी बोलताना मा. मनोजदादा घोरपडे म्हणाले एक स्त्री जर शिकलेली असेल तर ती कुटुंब पुढे नेते परंतु आपल्यासारखी कर्तुत्वान महिला जर असेल तर ती समाज पुढे घेऊन जात असते आपल्या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे आज जागतिक महिला दिनानिमित्त स्वाभिमानी महिला सखी मंचच्या वतीने आपला सन्मान करायला भेटला हे माझे सौभाग्य आहे .आपल्या प्रत्येक अडचणीमध्ये मी आपल्या सोबत सदैव असून आपल्या कार्याला उत्तरोत्तर हार्दिक शुभेच्छा आहेत. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आमदार आहे आणि मी आमदार म्हणजे आपण सर्व जणी आमदार आहात. 

        यावेळी बोलताना समताताई घोरपडे म्हणाल्या कराड उत्तर मधील महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वाभिमानी महिला सखी मंचची स्थापना केलेली असून शेवटच्या महिलेपर्यंत त्याचा फायदा देण्यासाठी सदैव आपल्यासाठी कार्यरत राहणार आहे. 

             यावेळी बोलताना तेजस्विनी घोरपडे म्हणाल्या स्वाभिमानी महिला सुखी मंचची स्थापना झाल्यापासून कराड उत्तर मधील 20000 माता भगिनी या समूहाला जोडलेल्या आहेत. अनेक महिला बचत गट यामध्ये कार्यरत झालेले आहेत परंतु बचत गटांनी उत्पादित केलेला माल त्याला बाजारपेठ मिळत नाही त्यासाठी इथून पुढच्या कालावधीमध्ये बचत गटाच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देन्यासाठी कार्य करणार आहोत. उपस्थित महिलांना सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी रीना घोरपडे, सारिका निकम, प्रतिभा कांबळे, स्वाती ढाणे, सुनंदा शिंदे, शशिकला जाधव, यमुना जाधव नकुसा चव्हाण, पल्लवी साळुंखे,उज्वला बाबर, अमिता जाधव, रुपाली मोहिते, अश्विनी काशीद, रुपाली सुपणेकर, आदी हजारो माता भगिनी व स्वाभिमानी महिला सखी मंच च्या पदाधिकारी उपस्थित होत्या. संचालन दीपक साबळे व आशिष मोहिते यांनी केले.आभार मनिषा शेडगे यांनी मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना अँप्रन बंधनकारक.. राज्य सरकारचे महाविद्यालयांना स्पष्ट निर्देश, निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत ..

Post Views: 13 राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना अँप्रन बंधनकारक.. राज्य सरकारचे महाविद्यालयांना स्पष्ट निर्देश, निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत .. वैद्यकीय सेवा

Live Cricket