Home » Uncategorized » क्राईम डायरी » आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या मोटारीच्या धडकेत तरुण ठार

आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या मोटारीच्या धडकेत तरुण ठार

आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या मोटारीच्या धडकेत तरुण ठार

अहिल्यानगर :बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाने कार चालवताना एका दुचाकीस्वाराला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव फाट्याजवळ (ता. पारनेर) भरधाव आलिशान मोटारीची धडक बसून एका तरुणाचा मृत्यू झाला. या संदर्भात सुपे पोलिसांनी चालक सागर सुरेश धस (रा. आष्टी, बीड) याच्यासह आणखी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सागर हा आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांचा मुलगा आहे.

अपघातानंतर सागर धस याला ताब्यात घेण्यात आल्याचे, तसेच तो चालवत असलेली मोटार पोलीस ठाण्यात आणण्यात आल्याची माहिती सुपे पोलीस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी दिली. या संदर्भात मृत नितीन शेळकेचा चुलतभाऊ स्वप्निल पोपट शेळके यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील मृत नितीन शेळके हा जातेगाव फाटा येथे हॉटेल चालवतो. तो दुचाकीवरून (एमएच १६ डीजे ३७६५) जात असताना पुण्याकडून भरधाव येणाऱ्या धस यांच्या मुलाच्या आलिशान मोटारीने (एमएच २३ बीजी २९२९) त्यांना धडक दिली. स्वप्निल शेळके व इतर नातेवाइकांनी जखमी नितीन शेळके याला तातडीने सुपे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे सांगितले. सुपे पोलिसांनी सागर धस याच्यासह सचिन दादासाहेब कोकणे (रा. तवलेवाडी, आष्टी, बीड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

प्रशासनाच्या प्रभावी नियोजनात पाचगणी नगरपरिषद निवडणूक शांततेत पार

Post Views: 25 प्रशासनाच्या प्रभावी नियोजनात पाचगणी नगरपरिषद निवडणूक शांततेत पार पाचगणी- पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद निवडणूक २०२५ प्रशासनाच्या काटेकोर नियोजनात

Live Cricket