कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » आमदार मनोज दादा घोरपडे यांनी घेतलेल्या कराड येथील जनता दरबारात जनतेचे 300 प्रश्न निकालात

आमदार मनोज दादा घोरपडे यांनी घेतलेल्या कराड येथील जनता दरबारात जनतेचे 300 प्रश्न निकालात

आमदार मनोज दादा घोरपडे यांनी घेतलेल्या कराड येथील जनता दरबारात जनतेचे 300 प्रश्न निकालात 

 कराड -कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार मनोज दादा घोरपडे यांनी आज ओगलेवाडी ता कराड येथे घेतलेल्या जनता दरबाराला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला या मध्ये 583 नागरिकांनी आपापल्या विविध विभागातील समस्या आमदार मनोज दादा घोरपडे व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समोर मांडल्या यावेळी 300 हून अधिक नागरिकांच्या समस्या आमदार मनोज दादा घोरपडे यांनी जागेवरच सोडवल्या. सर्व प्रथम पेहलगाम येथे झालेल्या अतेरेकी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्याना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी महसूल, भूमी अभिलेख, प्रांत विभाग, सार्वजनिक बांधकाम, एस टी महामंडळ, एम एस सी बी, मदत व पुनर्वसन,पोलीस अधिकारी,ग्रामविकास जलसंपदा,आरोग्य, एकात्मिक बालविकास, वनविभाग, शालेय शिक्षण,पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, पशुसंवर्धन, फेरफार,अदालत व कोषागार विभाग यासारख्या 22 शासकीय विभागामधील समस्या सोडविण्यात यश आले आहे.   

यावेळी आमदार मनोज दादा घोरपडे, कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, गट शिक्षणाधिकारी बिपिन मोरे, कृषी अधिकारी, नायब तहसीलदार राठोड उपनिबंधक यादव मॅडम यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. यावेळी शिधा पत्रिका वाटप करण्यात आले. तसेच स्वर्गीय गोपीनाथ मुंढे अपघात विमा च्या पात्र लाभार्त्यांना 2 लाख रुपये मंजुरी पत्र देण्यात आले. यावेळी बापूराव धोकटे,विजय कदम, नवनाथ पाटील, प्रकाश पवार,यशवंत डुबल,निलेश डुबल, संभाजी पिसाळ, विनायक भोसले, अमोल पवार,शिवाजी डुबल, आदी मान्यवर उपस्तित होते.

 कराड तालुक्यातील चार मंडळातील हजारो नागरिक उपस्थित 

 कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील चार मंडळातील विविध गावचे नागरिक महिला आपापल्या समस्या घेऊन आमदार मनोज दादा घोरपडे यांच्याकडे जनता दरबाराच्या निमित्ताने आल्या होत्या आमदार महोदयांनी जागेवरच अनेक प्रकरणांचा निपटारा करीत अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष नागरिकांना न्याय देण्याच्या सूचना केल्या.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket