आ.मकरंदआबा पाटील यांच्या प्रयत्नातून, सनी चव्हाण आणि सायली कट्टा मित्रपरिवार यांच्या पाठपुराव्यातून सिद्धनाथ वाडीतील विविध विकास कामांचा नितीन काकांच्या हस्ते शुभारंभ
वाई प्रतिनिधी :जननायक आमदार मकरंआबा पाटील यांच्या प्रयत्नातून व सनी चव्हाण आणि सायली कट्टा मित्रपरिवार यांच्या पाठपुराव्यातून नागोबा समोरील नाना नानी पुलाकडे जाणारा गंगापुरीकडे जाणारा पाणवठा रस्त्यासाठी 8 लाख 16 हजार व झोपडपट्टी रहिवासी संकुलातील नवीन ड्रेनेज टाकी, सर्व चेंबर्स व पाईपलाईन साठी 18 लाख 90 हजार रुपये असा एकूण 27 लाख 6 हजार रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ सातारा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष श्री.नितीन काका पाटील यांच्या हस्ते झाला.या शुभारंभ प्रसंगी सिद्धनाथवाडी ग्रामस्थांकडून श्री.नितीनकाका पाटील यांच्या खासदारकीच्या उमेदवारीसाठी एकमुखाने मागणी करण्यात आली
युवा नेते सनी चव्हाण यांनी सिद्धनाथवाडीच्या वतीने मा. नितीन काका पाटील यांच्या खासदारकीच्या उमेदवारीची एकमुखाने मागणी केली.
सिद्धनाथवाडी ग्रामस्थांकडून नितीन काका पाटील यांचा सत्कार करण्यात आला.वाईच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मा. नितीन काका पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना दिली.तसेच आमदार मकरंद आबा पाटील व मुख्याधिकारी किरण मोरे साहेब व विद्यमान मुख्याधिकारी श्रीमती संजीवनी दळवी मॅडम आणि सचिन धेंडे साहेब यांचे सिद्धनाथवाडी ग्रामस्थ मंडळाच्यावतीने आभार मानण्यात आले.
या शुभारंभ प्रसंगी सुधीर खरात पाटील,मोहन आबा जायगुडे, वामन आण्णा खरात, जयवंत भाऊ कचरे, भैय्यासाहेब डोंगरे,राजेश गुरव,संजय भाऊ चव्हाण, उमेश जायगुडे, मोहन नाना घाडगे,बापूराव खरात,हणमंतराव दुधाने,माजी नगराध्यक्ष भूषण दादा गायकवाड,भारत दादा खामकर,शामराव खरात, उत्तम घाडगे ,आवि मोरे,नितीन चौरे,विनोद चव्हाण,प्रसाद कचरे,राहुल जायगुडे,नारायण बरकडे,शंकर वाघ बंटी खरात,सुनील पवार साहेब,शिवाजी अण्णा पवार,प्रसाद सुळके मयूर खरात,शंकर नाना जायगुडे ,दीपक जायगुडे,रमेश जायगुडे,युगल घाडगे,प्रकाश खरात,नामदेव चौधरी,मनोज सुळके,धनु खरात,लक्ष्मण खरात,विलास राजपुरे,नंदकुमार निकम,अक्षय घाडगे,महेंद्र ढगे,नितीन गोटू चौधरी,राजू कारळे,अभिजित वाघ बाळू नाटेकर सनी गायकवाड महेश जायगुडे संदीप घाडगे,धैर्यशील खरात व ग्रामस्थ व युवक कार्यकर्ते उपस्थित होते. युवा नेतृत्व सनी चव्हाण यांच्या माध्यमातून सिद्धनाथ वाडीतील अनेक विकास कामे सध्या प्रगतीपथावर आहेत.