केळघर येथे भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सागर धनावडे यांच्या वाढदिवसानिमित्त युवकांचा भव्य मेळावा
केळघर प्रतिनिधी –सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले (बाबाराजे) यांचे कट्टर समर्थक तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे साहेब यांचे विश्वासू कार्यकर्ते, युवकांचे आयडॉल व मार्गदर्शक आणि भाजप युवा मोर्चाचे जावली तालुकाध्यक्ष श्री.सागर धनावडे (सर) यांच्या वाढदिवसानिमित्त युवकांचा भव्य मेळावा उद्या रविवारी सायंकाळी ७ वाजता आसनी येथे आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यास जावली तालुक्यातील सर्व युवक, जावलीतील सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच महिला मंडळांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सागर धनावडे मित्र समूह यांच्या वतीने करण्यात आले आहे.युवक संघटन, सामाजिक कार्य आणि पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सागर धनावडे यांनी केलेल्या कार्याची दखल घेत हा मेळावा उत्साहात साजरा करण्यात येणार असून, कार्यक्रमास विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.



