Post Views: 134
साताऱ्यामधील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांनी अटक केली आहे
सातारा -आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची चार पथकं रवाना झाली होती . अखेर प्रशांत बनकर याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल 24 तासांनी बनकर याला अटक केली आहे. मात्र या प्रकरणातील आणखी एक आरोपी PSI गोपाळ बदने हा 24 तासांनतरही फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
डॉक्टर महिलेने मृत्यूपूर्वी एक सुसाईड नोट लिहीली होती. PSI गोपाळ बदने याने आपल्यावर 4 वेळा अत्याचार केल्याचं तिने नोटमध्ये लिहीलं होतं. तर प्रशांत बनकर याने आपला मानसिक व शारीरीक छळ केल्याचा आरोप करत त्या तरूणीने आयुष्य संपवलं होतं. या प्रकरणामुळे मोठी खळबळ माजली होती.



