मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेनंतरही कराड भाजपाच्या हातातून निसटले; आमदार अतुल भोसले यांच्या कूचकामी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह पाचगणी नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिलीपभाऊ बगाडे विजयी महाबळेश्वर नगराध्यक्षपदी सुनील शिंदे; मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाला मतदारांची पसंती वाई फेस्टिवल २०२५ : जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत शंतनू येवले ‘उत्कर्ष श्री’ श्री घाटजाई नागरी सहकारी पतसंस्थेचा १९ वा वर्धापनदिन व संस्थापक नानासाहेब कासुर्डे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होणार एपस्टीन फाईलमधील उल्लेखाचं सरकारने स्पष्टीकरण द्यावे – पृथ्वीराज चव्हाण
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » कुंभरोशी येथे ‘धरती आबा जनजातीय ग्रामोत्कर्ष अभियान’ अंतर्गत आदिवासी बांधवांना विविध लाभांचे वाटप.

कुंभरोशी येथे ‘धरती आबा जनजातीय ग्रामोत्कर्ष अभियान’ अंतर्गत आदिवासी बांधवांना विविध लाभांचे वाटप.

कुंभरोशी येथे ‘धरती आबा जनजातीय ग्रामोत्कर्ष अभियान’ अंतर्गत आदिवासी बांधवांना विविध लाभांचे वाटप.

महाबळेश्वर- माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभरोशी, ता. महाबळेश्वर येथे ‘धरती आबा जनजातीय ग्रामोत्कर्ष अभियान’ अंतर्गत आदिवासी समाजातील लाभार्थींना विविध शासकीय योजनांचा लाभ वाटप करण्यात आला. वाईचे उपविभागीय अधिकारी, श्री. योगेशजी खरमाटे यांच्या हस्ते, महाबळेश्वर वन विभागाचे अधिकारी सुनील लांडगे  यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

या अभियानांतर्गत आदिवासी बांधवांना आवश्यक असणारी कागदपत्रे आणि योजनांचे लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले. यामध्ये २३ जात प्रमाणपत्रे, १९ अधिवास प्रमाणपत्रे, ५ आधारकार्ड, ७ रेशनकार्ड, १ संजय गांधी निराधार योजना आदेश, २ गॅस जोडण्या, ४२ आयुष्यमान कार्ड, ३५ मनरेगा जॉब कार्ड, ३३ परसबाग किट, ५ बेबीकिट, ८ घरकुल ८अ उतारे, आणि ६ अपंग कल्याण अनुदानांचे वाटप करण्यात आले. यामुळे आदिवासी समाजाला शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी होणारा त्रास कमी होण्यास मदत झाली.

यावेळी हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र या शतकोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत २० झाडांचे वृक्षारोपणही करण्यात आले.

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी, प्रकल्प अधिकारी प्रतिनिधी, सरपंच, जिल्हा व तालुका अध्यक्ष आदिवासी संघटना, नायब तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्यासह गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. या उपक्रमामुळे आदिवासी बांधवांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार असून, त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेनंतरही कराड भाजपाच्या हातातून निसटले; आमदार अतुल भोसले यांच्या कूचकामी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

Post Views: 734 मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेनंतरही कराड भाजपाच्या हातातून निसटले; आमदार अतुल भोसले यांच्या कूचकामी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह कराड(अली मुजावर )प्रतिनिधी

Live Cricket