Home » राज्य » शेत शिवार » किसन वीरांना अभिप्रेत असणारे काम मकरंदआबांकडुन सुरू – प्रमोद शिंदे

किसन वीरांना अभिप्रेत असणारे काम मकरंदआबांकडुन सुरू – प्रमोद शिंदे

किसन वीरांना अभिप्रेत असणारे काम मकरंदआबांकडुन सुरू – प्रमोद शिंदे

वाई- कारखान्याचे संस्थापक देशभक्त किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांनी जिल्ह्यामध्ये सातारा जिल्हा बँक, जनता शिक्षण संस्था, कारखान्याची उभारणी करून जिल्ह्यातील तरूणांच्या हाताला रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. तर धोम धरणाची निर्मिती करून शेतीसाठी पाण्याचा स्त्रोत्र निर्माण केला. कारखान्याची वाताहत झालेली असताना कारखान्याच्या हितासाठी नामदार मकरंदआबांनी कारखान्याची हातात घेतली. किसन वीर यांना अभिप्रेत असणारे काम कारखान्यामध्ये नामदार मकरंदआबाच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाकडून सुरू असल्याचे प्रतिपादन व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी केले.

किसन वीर यांच्या १२० व्या जयंती दिनानिमित्त कारखान्यावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे संचालक मंडळाची प्रमुख उपस्थिती होती.

प्रमोद शिंदे पुढे म्हणाले, गोकुळाष्टमीला किसन वीर यांची जयंतीनिमित्त आबासाहेब वीर सामाजिक पुरस्काराचे वितरण करीत असतो. यावर्षींचा पुरस्कार केंद्रिय मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांना जाहिर केलेला असून लवकरच हा कार्यक्रम होणार आहे. किसन वीर कारखान्यावरील बऱ्याच अडचणी सोडविल्या आहेत. उर्वरित अडचणीही लवकरच सोडविल्या जाणार आहेत. ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासदांनीही कारखान्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. मागील तीन हंगामामधील कोणत्याही प्रकारची देणी राहिलेली नाहीत. येणाऱ्या हंगामामध्ये संचालक मंडळाने ठरविलेले उद्दीष्ठाप्रमाणे गळीत होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असून सर्वानी आपला परिपक्व झालेला ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्याला गळितासाठी द्यावे, असे आवाहन करून येणारा काळ हा सर्वांसाठी सुखमय व आनंददायी असल्याची खात्री दिली व स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी कारखान्याचे संचालक संदिप चव्हाण यांनी किसन वीर यांच्या जीवनात केलेले विविध आंदोलने, भुमिगत राहुन केलेल्या चळवळी, प्रतिसरकार स्थापनेबाबतचे कार्य विस्तारीत करून १९४७ नंतरच्या काळात किसन वीरआबांनी आपल्या सामजिक, राजकीय जीवनातील स्थित्यंतरेबाबत उपस्थितीतांना मार्गदर्शन केले, आभार संचालक प्रकाश धुरगुडे यांनी मानले.

७९ व्या स्वातंत्रयदिनानिमित्त कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. तदनंतर किसन वीर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमास कारखान्याचे संचालक सचिन साळुखे, रामदास इथापे, प्रकाश धुरगुडे, संदीप चव्हाण, संजय कांबळे. हणमंत चवरे, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी

Post Views: 20 सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी सातारा:करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव

Live Cricket