अ.ब.ब. लिंबखिड ते आनेवाडी सेवा रस्त्यावर फुटभर खड्डेच खड्डे.
लिंबखिंड ते आनेवाडी सेवा रस्त्याची दैनाअवस्था… मार्गावर सर्वत्र खड्डेच खड्डे.वाहन चालकांनी वाहने सावकाश चालवावीत..
लिंब. – मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे लिंबखिंड ते आनेवाडी टोल नाका पर्यंतच्या सेवा रस्ता पूर्णपणे उखडलेला असून जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे या मार्गावरून वाहन चालकांनी प्रवास करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे वाहन चालकांसाठी धोकादायक ठरू पाहणारा या मार्गावरील हा सेवा रस्ता खूपच खराब झाला आहे या सेवा रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने हा रस्ता दरवर्षी खराब होत आहे निकृष्ट दर्जाचे होत असलेले येथील डांबरीकरण त्याचा नाहक त्रास वाहन चालकांना सोसावा लागत आहे या मार्गावरून मोठ्या प्रमाणात जड वाहने डंपर ट्रक यांची वाहतूक ही मोठ्या प्रमाणात असते सध्या या सेवा रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पाणी साचले आहे बऱ्याचदा वाहन चालकांना विशेषता टू व्हीलर वाहने खड्ड्यात साठलेल्या पाण्यात आदळतात त्यामुळे वाहन चालकांना शारीरिक इजा होत आहे.
– लिंबखिंड ते आनेवाडी टोल नाका येथील सेवा रस्ता नेहमीच खराब झाल्याचे दिसून येत आहे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांची ही संख्या मोठी आहे विशेषता मर्ढ कुशी नागेवाडी लिंब रायगाव सायगाव येथील नागरिक या सेवा रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात सध्या या सेवा रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत रस्त्यावर पाणी साचले आहे त्यामुळे या मार्गावरून वाहन चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते..
लिंबखिंड ते आनेवाडी टोल नाका या सेवा रस्त्यावरील खराब रस्त्यामुळे अनेक अपघाताच्या घटना या ठिकाणी घडल्या आहेत सुरक्षिततेच्या दृष्टीने या ठिकाणी उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे सातत्याने रस्ता खराब होत असल्याने यावर कायमस्वरूपी उपयोजना संबंधित विभागाने करणे अपेक्षित आहे तसेच रस्त्याच्या दुतर्फी पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारे काढणे आवश्यक आहे दरवर्षी पावसाळ्यात हा रस्ता खराब होत असून वाहन चालकांना वाहने चालवताना खूप त्रास होतो..
श्रीरंग काटेकर सातारा.
