श्रीपतराव पाटील हायस्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
सातारा: करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव पाटील हायस्कूल व जुनिअर कॉलेजमध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा केला.
विद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, देश गौरव करणाऱ्या घोषणा, बँड पथक, वाद्यवृंद व गीतमंचाने सादर केलेली देशभक्तीपर गीते, संगीत कवायत, भाषण, काव्यवाचन अशा उत्साही वातावरणात भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन करंजे पेठ येथील श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आणि करंजे येथील झेंडा चौक येथे साजरा करण्यात आला.
करंजे पेठ मधील ‘झेंडा चौक’ येथील ध्वजारोहण करंजे मधील सामाजिक कार्यकर्ते मा. मोहनराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले ,तर श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील ध्वजारोहण मराठा बिझनेसमन फोरम सातारा चे उपाध्यक्ष मा. जगदीश शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर विद्यालयातील इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेमध्ये विद्यालयाच्या गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांचा अतिथींच्या हस्ते बक्षीस देऊन गुणगौरव करण्यात आला.
कॅनरा बँकेमार्फत गरजू विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचे वाटप कॅनडा बँकेचे व्यवस्थापक मा. अजय चिंचकर व कॅनरा बँक चे C.S.A. मा. प्रमोद पिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांनी सादर केलेली संगीत कवायत व वाद्यवृंदाने सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी शिक्षण प्रसारक संस्थेच्या अध्यक्षा मा. सौ.वत्सला डुबल, उपाध्यक्ष मा. नंदकिशोर जगताप, संस्था सचिव मा. तुषार पाटील, चेअर पर्सन सौ प्रतिभा चव्हाण, संचालक मा. चंद्रकांत पाटील, मा. रवींद्र जाधव, व इतर सर्वच संचालक, गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ, सेवानिवृत्त शिक्षक मा. रामचंद्र जाधव, पर्यवेक्षक यशवंत गायकवाड, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
