सातारा जिल्हा पोलीस पाटील संघटनेची नवीन कार्यकारणी जाहीर अमित शिंदे यांची एकमताने जिल्हाध्यक्षपदी निवड
सातारा -महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ सातारा जिल्हा अध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारी पदग्रहण व मार्गदर्शन सोहळा मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी अलंकार हॉल पोलीस करून केंद्र सातारा येथे सकाळी 11 वाजता आयोजित केल्याची माहिती नूतन जिल्हाध्यक्ष श्री अमित शिंदे यांनी दिली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संतोष पाटील जिल्हाधिकारी सातारा, तुषार जोशी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील अध्यक्ष महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघ असणार आहेत.
शासन स्तरावर पोलीस पाटील यांच्या विविध मागण्यांसाठी अहोरात्र झटणाऱ्या महाराष्ट्रराज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी अमित शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.पोलीस पाटील यांच्या विविध प्रकारच्या मागण्यांसाठी अहोरात्र कार्यकारणी सोबत झटत शासनाला पोलीस पाटील यांचे स्थान व त्यांची गावातील कामगिरी गावकाम संघटना करत आहे, व त्यांच्या विविध समस्येवर तोडगा काढण्यासाठी गावकामगार पोलीस पाटील संघटनेने काम केले आहे.नवीन कार्यकारिणी एकमताने जाहीर करण्यात आली.पोलीस पाटील संघटनेच्या कार्यकारिणीची निवड ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे, कारण यामुळे संघटनेला योग्य दिशा मिळते.या निवडणुकीमुळे संघटनेत नवीन उत्साह आणि ऊर्जा निर्माण होत आहे.
