नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » लोणंद नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत डॉल्बी बंदीसह अनेक महत्त्वपूर्ण विकासनिर्णय

लोणंद नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत डॉल्बी बंदीसह अनेक महत्त्वपूर्ण विकासनिर्णय

लोणंद नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत डॉल्बी बंदीसह अनेक महत्त्वपूर्ण विकासनिर्णय

लोणंद, दि. 13 (प्रतिनिधी) – लोणंद नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा दिनांक 13 रोजी नगरपंचायत कार्यालयात पार पडली. नगराध्यक्षा मधुमती गालिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. उपनगराध्यक्ष गणीभाई कच्छी उपस्थित होते, तर मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी सभेसमोर सर्व प्रस्ताव मांडले.

सभेत घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये —

स्मारक उभारणी: लोणंद शहरातील सिटी सर्व्हे नं. 264 मधील सरकारी जागेवर छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांची स्मारके उभारण्याचा ठराव. या जागेची मोजणी करून स्मारक उभारणीसाठी एजन्सी नेमण्याचे नियोजन.

राष्ट्रीय महामार्ग विस्तार: लोणंद-सातारा रस्ता (NH965DD व NH965D) शहरातून जाताना कोणतेही खाजगी दुकाने किंवा मालमत्ता अधिग्रहित न करता काम करण्याचे निर्देश.

कर नोंदीत सवलत: नगरपंचायतीच्या मिळकत कर नोंदीवर कर्ज/गहाण खत नोंदवण्यासाठी 0.15% ते 0.30% इतका दर निश्चित.

डॉल्बी व डी.जे. बंदी: व्यापारी महासंघ, मेडिकल असोसिएशन व नागरिकांच्या मागणीवरून लोणंद शहरात डी.जे. व डॉल्बी वाजविण्यास बंदी. पोलीस प्रशासनाने कडक अंमलबजावणी करावी, यासाठी पत्रव्यवहार करण्याचा ठराव.

या निर्णयांना सभागृहाने एकमताने मंजुरी दिली.

सभेत नगराध्यक्षा मधुमती गालिंदे, उपनगराध्यक्ष गणीभाई कच्छी, मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड, बांधकाम सभापती सुप्रिया शेळके, पाणीपुरवठा सभापती सचिन शेळके, तसेच नगरसेवक रविंद्र क्षीरसागर, शिवाजीराव शेळके पाटील, भरत शेळके, भरत बोडरे, माजी नगराध्यक्षा सीमा खरात, रशिदा इनामदार, दिपाली शेळके, राजश्री पाटील, तृप्ती घाडगे, दिपाली संदीप शेळके, ज्योती डोनीकर, प्रविण व्हावळ, आनंदराव शेळके पाटील, युवा नगरसेवक सागर शेळके आणि सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

नगराध्यक्षा मधुमती गालिंदे यांनी सांगितले की, “या निर्णयांमुळे लोणंद शहराचा सार्वजनिक वाहतूक, स्वच्छता, पर्यावरण आणि नागरी सुविधांच्या क्षेत्रात लक्षणीय विकास होणार आहे.” मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनीही या कामांची अंमलबजावणी वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने होईल, असे आश्वासन दिले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket