Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » पांचगणी पालिकेच्या ‘हिलदारी’ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांचा ‘कचरामुक्ती’ संकल्प: ‘हर घर स्वच्छतेकडे’ वाटचाल

पांचगणी पालिकेच्या ‘हिलदारी’ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांचा ‘कचरामुक्ती’ संकल्प: ‘हर घर स्वच्छतेकडे’ वाटचाल

पांचगणी पालिकेच्या ‘हिलदारी’ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांचा ‘कचरामुक्ती’ संकल्प: ‘हर घर स्वच्छतेकडे’ वाटचाल

महाबळेश्वर, १३ ऑगस्ट २०२५: पांचगणी गिरीस्थान नगरपरिषद आणि ‘हिलदारी’ यांच्या संयुक्त विद्यमाने आज ‘हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता’ अभियानांतर्गत शहरात दोन ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. महात्मा फुले विद्यामंदिर आणि श्रीमती कांताबेन जे.पी. मेहता ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही मोहीम यशस्वी ठरली.

मोहिमेची सुरुवात ‘हिलदारी’चे डॉ. मुकेश कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व, कचरा संकलनातील सुरक्षितता आणि योग्य पद्धती यावर सविस्तर माहिती दिली. यानंतर, विद्यार्थ्यांचे दोन गट करण्यात आले. एका गटाने महात्मा फुले विद्यामंदिरच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील परिसर स्वच्छ केला, तर दुसऱ्या गटाने अण्णाभाऊ साठे नगर परिसरातील सुका व प्लास्टिक कचरा गोळा केला.

या मोहिमेत १०० हून अधिक विद्यार्थी आणि १० हून अधिक शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला. ‘हिलदारी’ संस्थेने विद्यार्थ्यांना स्टिक, हँडग्लोव्हज आणि कचरा गोळा करण्यासाठी आवश्यक बॅग्ज उपलब्ध करून दिल्या होत्या. या अथक परिश्रमातून एकूण १८७ किलो सुका कचरा संकलित करण्यात आला.

मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. पंडित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. स्वच्छता निरीक्षक सागर बडेकर, आरोग्य विभाग प्रमुख स्वाती पाटील, सहाय्यक निरीक्षक गणेश कासुर्डे, शहर समन्वयक ओंकार ढोले, सुरेश मडके, तसेच पालिकेचे कर्मचारी यांनी मोहिमेत सक्रिय सहकार्य केले. याशिवाय, महात्मा फुले विद्यामंदिर आणि श्रीमती कांताबेन जे.पी. मेहता ज्युनियर कॉलेजचे शिक्षक रामचंद्र वरणे, सुनील कांबळे, दीपक पाटील, सुनील बाबर, शिवाजी सुरवसे, भारती पवार, दिशा कांबळे, वर्षा कासुर्डे आणि अग्रवाल यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. ‘हिलदारी’ संस्थेकडून दीपक मदने, गणेश शेडगे, दिपाली धनावडे, प्राजक्ता बोडरे, अस्मिता कासुर्डे आणि शुभम भंडारे यांनी मोहिमेसाठी विशेष परिश्रम घेतले.

या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण झाली असून, पांचगणी शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी ही मोहीम एक महत्त्वाचे पाऊल ठरली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

देश प्रथम! मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी रद्द केला लंडन-पॅरिस दौरा”

देश प्रथम! मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी रद्द केला लंडन-पॅरिस दौरा” मुंबई-देशातील सध्याची कठीण आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता

Live Cricket