मंजूर घरकुल हप्ते वेळेत मिळणेबाबत घरकुल अनुदानात वाढ करण्याबाबत घरकुल संघर्ष समिती कराड एकटवली
कराड प्रतिनिधी-(सुनील पाटील )कराड तालुक्यातील घरकुलांना 2 लाख 65 हजार निधी मिळावा व रखडलेले घरकुलचे हप्ते लवकर सोडावेत यासाठी कराड पंचायत समिती येथे निवेदन मोर्चा काढण्यात आला.घरकुल संघर्ष समितीचे अध्यक्ष संग्रामबाबा पवार यांच्या नेतृत्वात घरकुल प्रश्नासाठी निवेदन देण्यात आले
शहरी भागासाठी घरकुलला 2 लाख 65 हजार निधी देण्यात येतो परंतु ग्रामीण भागासाठी फक्त 1.5 लाख देण्यात येतात हा भेदभाव न करता सर्वाना सारखेच अनुदान देण्यात यावे ही मागणी प्रामुख्याने करण्यात आली
तसेच तालुक्यात घरकुलचे फक्त दोनच हप्ते जमा झाले असुन पुढील हप्त्याची वाट बघत लोकांची घरे रखडली आहेत त्यामुळे पुढील हप्ते लवकर जमा करावेत म्हणून गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे मोफत वाळू मिळत नसल्याचेही लाभार्थीकडून सांगण्यात आले. वाळू ठेकेदार वाळू देत नसल्याचेही लक्षात आणून दिले
घरकुल बांधण्यासाठी व्याजाने पैसे घेऊन लोकं काम करत आहेत परंतु शासनाचे अनुदान लवकर येत नसल्याने लोकांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे सदर मोर्चात महिला मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या.





