गोडोली तळे सुशोभीकरणाच्या कामाची पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी केली पाहणी
सातारा :सातारा येथील गोडोली तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामाची आज पालकमंत्री मा. ना.शंभूराज देसाई साहेबांनी पाहणी केली. सातारा नगरपालिकेने अत्यंत चांगल्या पद्धतीने सुशोभीकरणाचे काम केले असून गोडोली तळे साताऱ्याच्या सौंदर्यात भर घालेल, असा विश्वास मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी याप्रसंगी व्यक्त केला. ‘अमृत भारत’ योजनेतून गोडोली तळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे उद्घाटन पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते ऑनलाइन व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.
या पाहणीवेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्यासह नगरपालिकेतील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
