कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » यशोदा फार्मसी महाविद्यालयाची आयुर्वेदिक अर्कशाळेला भेट.

यशोदा फार्मसी महाविद्यालयाची आयुर्वेदिक अर्कशाळेला भेट.

यशोदा फार्मसी महाविद्यालयाची आयुर्वेदिक अर्कशाळेला भेट.

यशोदा कॉलेज ऑफ फार्मसी मधील तृतीय वर्षातील बी.फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच आयुर्वेदिक अर्कशाळा सातारा या आयुर्वेदीय औषधनिर्मिती कंपनीला औद्योगिक भेट दिली. ही भेट विद्यार्थ्यांच्या औद्योगिक ज्ञानात भर घालणारी ठरली. अर्कशाळेतील तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना आयुर्वेदीय औषधनिर्मितीच्या विविध टप्प्यांविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण, संशोधन आणि विकास विभाग तसेच GMP (Good Manufacturing Practices) याविषयी सखोल माहिती मिळवली. विद्यार्थ्यांनीही या भेटीबद्दल समाधान व्यक्त करत भविष्यातील उद्दिष्टे ठरवण्यासाठी ही भेट उपयुक्त ठरल्याचे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना आयुर्वेदिक औषधांच्या वाढत्या गरजेबाबत माहिती देत अशा भेटीचे महत्त्व स्पष्ट केले.

या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना आयुर्वेदीय औषधनिर्मितीतील पारंपरिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष ओळख करून देणे हा होता. अर्कशाळेमध्ये हर्बल औषधी वनस्पतींचे वर्गीकरण, अर्कनिर्मिती प्रक्रिया, साठवण आणि गुणवत्ताविषयक उपाययोजना याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली.

विद्यार्थ्यांनीही ही भेट अत्यंत ज्ञानवर्धक ठरल्याचे सांगितले व भविष्यात आयुर्वेद क्षेत्रात संशोधन करण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांनी या भेटीचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या व्यावहारिक ज्ञानातून आपल्या करिअरला योग्य दिशा मिळवावी असे सांगितले.यशोदा कॉलेज ऑफ फार्मसी आणि आयुर्वेदिक अर्कशाळा, सातारा यांच्यामध्ये सामंजस करार झाला. याचा उपयोग औद्योगीक क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्र यांच्यातील अंतर कमी होण्यासाठी उपयुक्त ठरेल. यशोदा कॉलेज चे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे यांचेही सहकार्य लाभले त्यासाठी त्यांचेही मनःपूर्वक आभार. तसेच कॉलेज चे प्राचार्य डॉ व्ही. जे. चवरे, अर्कशाळेचे महाव्यवस्थापक मकरंद एरंडे आणि उत्पादनं प्रभारी सतिश देशपांडे यांचेही आभार. यावेळी यशोदा कॉलेज चे प्राध्यापक आणि प्राध्यापिका उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket