Home » Uncategorized » क्राईम डायरी » रस्त्यावर व्यायाम करताना भरधाव ट्रकनं 6 मुलांना चिरडलं; चौघांचा मृत्यू, गडचिरोलीतील भयावह घटना

रस्त्यावर व्यायाम करताना भरधाव ट्रकनं 6 मुलांना चिरडलं; चौघांचा मृत्यू, गडचिरोलीतील भयावह घटना

रस्त्यावर व्यायाम करताना भरधाव ट्रकनं 6 मुलांना चिरडलं; चौघांचा मृत्यू, गडचिरोलीतील भयावह घटना

दोन मुलांचा जागीच मृत्यू तर दोघांचा गडचिरोलीच्या रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर काटली गावात शोककळा पसरली आहे.

गडचिरोलीमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. भरधाव ट्रकने 6 मुलांना चिरडल्याची माहिती आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोघांना नागपुरच्या रूग्णालयांमध्ये हलवण्यात आलं आहे. 

गडचिरोली- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील काटली येथे ही भीषण अपघाताची घटना घडली आहे. सहाही मुलं रस्त्यावर व्यायाम करत असताना अज्ञात ट्रकची जोरदार धडक बसली. दोन मुलांचा जागीच मृत्यू तर दोघांचा गडचिरोलीच्या रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर काटली गावात शोककळा पसरली आहे, संतप्त गावकऱ्यांकडून राष्ट्रीय महामार्गावर चक्काजामचा प्रयत्न सुरू आहे. गडचिरोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सहाही मुलं रस्त्यावर व्यायाम करत होती, त्याचवेळी अज्ञात ट्रकची जोरदार धडक बसल्याने दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघांचा गडचिरोलीच्या रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आलं मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी दोघांना नागपुरच्या रूग्णालयात हलवण्यात आलं आहे, या अपघातानंतर काटली गावात शोककळा पसरली आहे, संतप्त गावकऱ्यांकडून राष्ट्रीय महामार्गावर चक्काजामचा प्रयत्न सुरू आहे. गडचिरोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी

Post Views: 53 सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी सातारा:करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव

Live Cricket